नाशिकच्या रुग्णालयातील संतापजनक प्रकार
एका बाजूला राज्यात कोरोना फोफावत आहे. राज्याची रुग्णसंख्या दररोज हजारोंनी वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, सगळ्याचा तुटवडा जाणवत आहे. दुसरीकडे केंद्राने मदत म्हणून पाठवलेले व्हेंटिलेटर्स मात्र रुग्णालयात धूळ खात पडून आहेत. त्यामुळे एका बाजूला सातत्याने केंद्राकडे बोट दाखवायचं, पण केंद्राने दिलेल्या मदतीचा वापर करायचा नाही, असला घृणास्पद प्रकार महाराष्ट्रात चालू असल्याचं समोर आलं आहे. भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकरांनी सरकारच्या या नाकर्तेपणावर बोचरी टीका केली आहे.
नाशिकला पीएम केअर फंडातून ६० व्हेंटिलिटर मिळाले होते. परंतु ते जोडणी अभावी अजूनही बिटको रुग्णलयात धूळखात पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्रातील वैशाख वणव्यावर पावसाच्या सरींचा उतारा
कोविड पाठोपाठ बळावतोय आणखी एका आजाराचा धोका
४६ वर्षांनंतर आणखी एक पारसी खेळाडू टीम इंडियाचा भाग
कोविड रुग्णांना भारतीय बनावटीच्या ‘वायुपुत्रा’ची साथ
याबाबत मनपा आयुक्तांना जाब विचारला असता त्यांनी या सगळ्याचे खापर संबंधित कंपनीवर फोडले. त्यानंतर ठाकरे सरकारमधील प्रथेप्रमाणे आरोप- प्रत्यारोपांचे राजकारणही रंगले. मात्र, या सगळ्यात या व्हेंटिलेटर्सची जोडणी करुन रुग्णांचे जीव वाचवता येतील, असा विचार अद्याप प्रशासनाच्या मनात आलेला नाही.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतामध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जगातील अनेक देशांनी भारतात ऑक्सिजन आणि वैद्यकीय साधनसामुग्रीचा पाठवायला सुरुवात केली होती. मदतीचा हा ओघ प्रचंड असल्याने साधारण प्रत्येक दिवशी भारतात वैद्यकीय साधनसामुग्री असलेली विमाने उतरत आहेत.
केंद्राला प्राप्त होणारी ही मदत राज्यांमध्ये वाटली जात आहे. मात्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी बेधडक महाराष्ट्राला मदत देण्यात भेदभाव केला जात असल्याचे अत्यंत हास्यास्पद विधान केले होते. त्यानंतर खुद्द राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील रेमडेसिवीर बाबतीतील एका विधानामुळे सावंत यांचे खोटेपण उघड झाले होते. आता तर ठाकरे सरकारच्या कृतीनेच राज्य सरकार नाकर्ते असल्याचे दाखवून दिले आहे. केंद्रातील पीएम केअर्स फंडातून मिळालेली मदत वापरण्याची देखील क्षमता ठाकरे सरकारच्या प्रशासनात नसल्याचे समोर आले आहे.
सरकारच्या षंढ पणावर भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी अत्यंत जहाल टीका केली आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये ठाकरे सरकारच्या कारभाराला निकम्मा कारभार म्हटले आहे. ते ट्वीट मध्ये म्हणतात,
केंद्र सरकारच्या नावाने रोज ठणाणा करायचा आणि जे मिळालंय त्याची अशी नासाडी करायची तूर डाळ असो वा व्हेंटिलेटर. ठाकरे सरकार, निकम्मा कारभार.
केंद्र सरकारच्या नावाने रोज ठणाणा करायचा आणि जे मिळालंय त्याची अशी नासाडी करायची तूर डाळ असो वा व्हेंटिलेटर.
ठाकरे सरकार, निकम्मा कारभार.https://t.co/LXwmwzT7cR— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 8, 2021