बुलढाणा पतसंस्थेत सापडलेले ते ५३.७२ कोटी कोणाचे?

बुलढाणा पतसंस्थेत सापडलेले ते ५३.७२ कोटी कोणाचे?

आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था अशी ओळख असलेल्या बुलढाणा सहकारी पतसंस्थेत आयकर विभागिला सापडलेले ५३.७२ कोटी रूपये नेमके कोणाचे आहेत? असा सवाल भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी विचारला आहे.

बुलढाणा नागरी पतसंस्थेच्याद्वारे कोट्यवधी रुपयाचे बेनामी व्यवहार होत असल्याची माहिती गेले अनेक महिने येत होती. ठाकरे सरकारमधील मंत्री आणि या पतसंस्थेचे अध्यक्ष वगैरेच्या माध्यमातून अश्या प्रकाराचे शेकडो बेनामी खाती उघडणे, त्यात रोख रक्कम जमा करणे व त्या समोर कोट्यावधी रूपयांचे कर्ज देण्याचे व्यवहारही पुढे येत आहेत, असे सोमैय्या म्हणाले.

तर या पतसंस्थेद्वारा ठाकरे सरकारच्या मंत्र्याला ७० कोटींचे कर्ज अपारदर्शक पध्दतीने देण्यात आल्याचा आरोप सोमैय्यांनी केला आहे. या पतसंस्थेच्या नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शाखेत मोठ्या प्रमाणात मनी लाॅन्डरींग झाल्याचे समजते असे सोमैय्या म्हणाले. तर या प्रकरणात पाठपुरावा करण्यासाठी आपण दिल्ली येथे जात असल्याची माहिती सोमैय्यांनी दिली. दिल्लीत सहकार मंत्रालय, ईडी, आयकर विभागाच्या विविध अधिकाऱ्यांना ते भेटणार आहेत. तर नंतर ते नांदेड येथेही जाणार आहेत.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातील अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँकेवर आयकर विभागाचे छापे

PM मोदी पुन्हा अव्वल

दाऊदचा साथीदार चिंकू पठाण सोबत अनिल देशमुख काय करत होते?

अनिल देशमुखांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी

२७ ऑक्टोबर रोजी आयकर विभागाने कारवाई करताना बुलढाणा अर्बन पतसंस्थेच्या मुख्यालयावर आणि एका शाखेवर छापा मारला. या छापेमारीतून चुकीच्या पद्धतीने उघडण्यात आलेली १२०० खाती आढळून आली आहेत. तर नियमबाह्य पद्धतीने ठेवलेल्या ठेवी आणि दिलेली कर्जही आढळून आली आहेत. या सर्व व्यवहारात पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांनीच फॉर्म भरून, सही अथवा अंगठा उमटवत खाती उघडतयाचे निदर्शनास आले. या सर्व प्रकरणात किरीट सोमैय्या उल्लेख करत असलेले मंत्री म्हणजे अशोक चव्हाण असल्याची कुजबुज रंगली आहे.

Exit mobile version