आसाम पूरग्रस्तांसाठी शिंदे गटाकडून भरघोस मदत

आसाम पूरग्रस्तांसाठी शिंदे गटाकडून भरघोस मदत

शिवसेनेतील बंडखोर आमदार हे आसाममधील गुहावाटी येथे वास्तव्याला आहेत. सध्या आसाममध्ये पुरामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. यावरून बंडखोर आमदारांवर मंत्री आदित्य ठाकरेंकडून टीका करण्यात आली होती. आसाममधील पूरग्रस्तांना या आमदारांनी मदत करावी, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि आमदारांनी आसाम पूरग्रस्तांना मदत केल्याची बातमी समोर आली आहे.

एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं आहे की, “आसाम मधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्यावतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत ५१ लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय.” आमदारांच्या या निर्णयाचं कौतुक होत असून महाराष्ट्रातील शिवसेना आमदार आणि मंत्री मदत करणार का, असे सवाल आता विचारले जात आहेत.

हे ही वाचा:

महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश

तारापूर एमआयडीसी प्लांटमध्ये भीषण आग

सरकारला आली जाग! औरंगाबादचे संभाजीनगर करणार

‘अल्ट न्यूज’चे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर यांना अटक

एकनाथ शिंदे यांनी मंगळवार, २८ जून रोजी मुंबईतील कुर्ला येथील इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना मदत जाहीर केली होती. त्यानंतर या आमदारांनी आसाममधील पूर परिस्थितीमध्ये तिथल्या नागरिकांना मदत करावी अशी टीका करण्यात आली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि सर्व उर्वरित आमदार उद्या मुंबईत येणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

Exit mobile version