उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या प्रचारासाठी जगभरातील उत्तर प्रदेशच्या नागरिकांनी “अब की बारी उत्तर प्रदेश में राम राज्य की तैयारी” नावाची डिजिटल प्रचार मोहीम सुरु केली आहे. या प्रचार मोहिमेचा प्रारंभ भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, या मोहिमेचे संयोजक आणि आयटी व्यावसायिक संतोष गुप्ता यांच्या उपस्थितीत शनिवारी भाजपा प्रदेश कार्यालयात करण्यात आला.
या उद्घाटन प्रसंगी बोलताना महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले की, “२०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर आणि २०१७ साली योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यावर उत्तर प्रदेशची घोडदौड ज्या प्रकारे सुरू आहे त्यामुळे विकासाचे आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. हे डोळ्यासमोर ठेवूनच ‘अब की बारी उत्तर प्रदेश में राम राज्य की तैयारी’ अशा नावाने हे कॅम्पेन सुरू करण्यात आले आहे. यामुळे उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपाचे सरकार बनवण्यासाठी प्रयत्न केला जाईल.” यावेळी त्यांनी हे कॅम्पेन सुरू करण्यासाठी संतोष गुप्ता आणि त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.
हे ही वाचा:
चीन नरमला; अपहृत तरुणाची करणार सुटका
नागपुरात एमपीएसी पेपरफुटी प्रकरणामुळे खळबळ; अभाविपचे तीव्र आंदोलन
‘नेताजींच्या जीवनमूल्यांचे अनुकरण करायला हवे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल’
…अमिताभने लेस बांधताना दिली मुलाखतीची अपॉइंटमेंट
ये कॅम्पेनच्या अंतर्गत ५०० पेक्षा जास्त परदेश स्थित भारतीय नागरिक उत्तर प्रदेशात दाखल होणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीला विधानसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी प्रचार करणार आहेत. या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी दिपा सिंह, निलेश जोशी, अमित दुबे, रवि शुक्ला (न्यूयॉर्क) असे अनेक परदेश स्थित भारतीय परत येणार आहेत. हे कॅम्पेन लॉन्च करण्या आधी उत्तर भारतीय मोर्चाचे संजय पांडेय आणि महाराष्ट्र भाजपच्या माध्यम विभागाचे सहसंयोजक ओम प्रकाश चौहान यांच्याशी चर्चा केली होती.