आसाम मेघालयमध्ये गेल्या ५० वर्षापासून सुरु असलेला सीमावाद आता संपुष्टात आला आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दोन्ही राज्यांमध्ये सुरू असलेला सीमावाद सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. या वादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही मुख्यमंत्र्यांनी करार केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला आहे.
आसाम मेघालयमध्ये १९७२ पासून सीमा वाद सुरु होता. गेल्या ५० वर्षात हा वाद मिटवण्यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र याचा काहीही उपयोग झाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सततच्या प्रयत्नांमुळेच हे ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये दोन्ही मुख्यमंत्र्यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती, त्यानंतर तो गृह मंत्रालयाकडे विचारार्थ पाठवण्यात आला होता.
यावेळी आनंद व्यक्त करताना केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, “आसाम आणि मेघालय यांच्यातील ५० वर्षांचा सीमावाद आज निकाली लागला आहे. विवादाच्या १२ पैकी ६ ठिकाणांचे प्रकरण मार्गी लागले आहे. उर्वरित ६ ठिकाणांचा प्रश्नही लवकरात लवकर सोडवला जाईल. २०२४ पासून पंतप्रधान मोदींनी ईशान्य क्षेत्राच्या विकासासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. सीमा विवाद सोडवण्यासाठी आसामचे मुख्यमंत्री आणि मेघालयच्या मुख्यमंत्री यांनीही खूप प्रयत्न केले आहेत. ”
हे ही वाचा:
मोहित कंबोज यांची मागणी; मशिदींवर बेकायदेशीर भोंगे हटवा!
महाराष्ट्रातील या ठिकाणांवर होणार ग्रीनफिल्ड विमानतळ
शाळकरी विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी लांबणीवर!
प्रवीण दरेकरांना पुन्हा दोन आठवड्यांचा दिलासा!
गेल्या ५० वर्षांपासून दोन्ही राज्यांमध्ये सीमा विवाद होता. या करारामुळे मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सीमा विवादामुळे यापूर्वी अनेक हिंसक घटना या ठिकाणी घडल्या आहेत. २०१० मध्ये अशीच एक मोठी घटना घडली होती, या घटनेत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चार जण ठार झाले होते.