जम्मू -काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात सोमवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान लष्कराचा एक अधिकारी आणि इतर चार जवान शहीद झाले आहेत. सुरणकोट येथील डेरा-की-गलीजवळील गावात दहशतवादविरोधी कारवाई पहाटेच्या सुमारास करण्यात आली.
दाब धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी सैन्य पथकांवर गोळीबार केला. परिणामी कनिष्ठ कमिशन्ड अधिकारी किंवा जेसीओ आणि इतर चार सैनिक गंभीर जखमी झाले. या जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला.
लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितले की, “हे ऑपेरेशन अजूनही सुरू आहे. पुंछ जिल्ह्याच्या सुरनकोट भागातील डीकेजी जवळील गावांमध्ये गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीच्या आधारे भारतीय लष्कराने शोध मोहीम राबवल्यानंतर लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. सैन्याकडूनही आता दहशतवाद्यांवर गोळीबार केला जात आहे.
हे ही वाचा:
‘बंद आणि विरोध यांचा “धंदा”, गोळा होतो त्यावरच “चंदा”!’
नवाब मलिकविरोधात १०० कोटींचा दावा करणार मोहित कंबोज
चेन्नई सुपर किंग्स पुन्हा एकदा अंतिम फेरीत
आरीफ मोहम्मद खान म्हणतात, अल्पसंख्य ही संकल्पनाच मान्य नाही, मी भारतीय आहे
दहशतवाद्यांशी ही चकमक सुरू असून अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे. असे संरक्षण प्रवक्त्याने सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, चामरेर जंगलात जोरदार सशस्त्र दहशतवाद्यांच्या गटाच्या उपस्थितीच्या बातम्या आल्या आहेत. दहशतवादी नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून भारतात आले आहेत. दहशतवाद्यांच्या सुटकेचे सर्व मार्ग बंद करण्यासाठी या भागात अधिक कुमक पुरवली जात आहे.