तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या खात्यावरून दुबईतून ४७वेळा लॉग इन झाल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने लोकसभेच्या नैतिकता पालन समितीला कळवले आहे. पैसे घेऊन लोकसभेत प्रश्न विचारल्याचा आरोप असलेल्या मोईत्रा यांची या समितीसमोर आज, गुरुवारी चौकशी होणार आहे.
याआधी मोईत्रा यांनी लॉगइन आयडी आणि पासवर्ड उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांना दिल्याची कबुली दिली होती. दर्शन हे त्यांचे खूप वर्षांपासूनचे निकटचे मित्र असल्याचे सांगत यामागे कोणताही आर्थिक हेतू नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
नैतिकता पालन समितीसमोर गुरुवारी मोईत्रा हजर होणार असतानाच ही नवी माहिती उघड झाली आहे. मोईत्रा यांनी त्यांच्या संसदेच्या खात्याचे लॉग इन आयडी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांना दिले, मात्र यामागे कोणताही आर्थिक हेतू नव्हता, तर त्यांनी विचारलेले प्रश्न हे त्यांचे स्वतःचे होते, असा दावा केला आहे.
महुआ मोइत्रा यांनी त्यांच्या खासदारकीच्या कार्यकाळात एकूण १४ परदेश दौरे केले. मात्र त्यांनी लोकसभाध्यक्षांच्या कार्यालयाला या परदेशी दौऱ्याबाबतची आवश्यक ती माहिती दिली नाही, असा आरोप भाजपने केला आहे. महुआ यांनी १० मे, २०२२ रोजी ब्रिटन, २० नोव्हेंबर २०२२ रोजी युनायटेड अरब अमिरात, १३ मे, २०२३ रोजी अमेरिका, १३ जून, २०२३ रोजी फ्रान्स, ११ ऑगस्ट २०२३ रोजी यूएई आणि १ सप्टेंबर, २०२३ रोजी फ्रान्सचा दौरा केला. तसेच, १३ फेब्रुवारी, २०१९ रोजी ब्रिटनला, २ सप्टेंबर, २०१९ रोजी अमेरिकेला, ८ ऑक्टोबरला, २०१९ रोजी बांग्लादेशला आणि १२ जानेवारी २०२० रोजी ब्रिटनला भेट दिली. तसेच, १३ फेब्रुवारी, २०२० रोजी अमेरिका, ६ मार्च, २०२० रोजी नेपाळ, १ ऑक्टोबर, २०२० रोजी ब्रिटन आणि ७ नोव्हेंबर, २०२१ रोजी यूएईला भेट दिली असे सूत्रांनी सांगितले.
हे ही वाचा:
‘गाझामधील हल्ला म्हणजे तालिबानी मानसिकतेला चिरडणे’
२० लाख अफगाणी नागरिकांना पाकिस्तान परत पाठवणार
कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसालाच जमावाने घेरून केली मारहाण
हमासचे ३०० तळ आणि भुयारांचे जाळे उद्ध्वस्त; हमासचा कमांडर ठार
मोईत्रा नैतिकता पालन समितीसमोर गुरुवारी हजर होणार आहेत. त्यांची चौकशी करण्यापूर्वी समितीला गृह, माहिती-तंत्रज्ञान (आयटी) आणि परराष्ट्र मंत्रालयांचे अहवालही प्राप्त झाले आहेत.