कसबा, चिंचवड उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद; आता लक्ष २ मार्च कडे

चिंचवडमध्ये ४१.१ % तर कसबा पेठेत ४५.२५ % मतदान

कसबा, चिंचवड उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद; आता लक्ष २ मार्च कडे

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघातील मतदान प्रक्रिया संध्याकाळी ५ वाजता संपली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चिंचवडमध्ये ४१.१ % तर कसबा पेठेत ४५.२५ % मतदान झाले.मतदानाचा निकाल २ मार्चला लागणार आहे.

या दोन्ही मतदार संघातील ४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणुकीची रंगत अधिकच वाढली असून आता निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. मतपेटीत बंद झालेल्या या उमेदवारांच्या भवितव्य २ मार्चलाच कळू शकणार आहे.

मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने या दोन्ही जागांसाठी रविवार, २६ फेब्रुवारीला ही पोटनिवडणूक झाली. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने या दोन्ही जागांसाठी ही पोटनिवडणूक झाली आहे. कसबा पोटनिवडणुकीत एकूण १६ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत एकूण २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

हे ही वाचा:

मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक

‘भगूर’ १५ दिवसात होणार पर्यटन स्थळ

काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग, आणखी एक काश्मिरी पंडिताची हत्या

अजितदादा, ही पोटदुखी कशामुळे? शिंदे-फडणवीसांनी विचारला सवाल

गिरीश बापट यांचे ऑक्सिजन सिलेंडर सोबत मतदान

खासदार गिरीश बापट यांनी अहिल्याबाई देवी हायस्कूल मतदान केंद्रावर येऊन मतदान केलं. गिरीश बापट ऑक्सिजन सिलेंडर सोबत घेऊन मतदानासाठी आले होते. बोटावरील शाई दाखवतं त्यांनी मतदान केल्याचं दर्शवलं. आजारपणातही त्यांचा मतदानासाठी उत्साह दिसून येत होता. कार्यकर्त्यांची गर्दी यावेळी झाली होती.

टिळक परिवाराने बजावला मतदानाचा हक्क

कसबा पेठेतल्या कन्या शाळेतील मतदान केंद्रावर टिळक परिवाराने मतदानाचा हक्क बजावला. शैलेश टिळक, चैत्राली टिळक आणि कुणाल टिळक यांनी मतदान केले. दरवेळी मुक्ताताईंसोबत मतदान करायला जायचो, आज पहिल्यांदाच त्यांच्याशिवाय मतदान करत असल्याच्या भावना शैलेश टिळक यांनी व्यक्त केल्या.

मतदानासाठी अमृता देवकर लंडनहून थेट कसब्यात

मतदानासाठी अमृता देवकर थेट लंडनमधील मँचेस्टर येथून कसब्या मध्ये पोहोचल्या आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.आपल्याला पुढे जायचं असेल आपला देश पुढे न्यायचा असेल तर मतदानाचा हक्क सर्वांनी बजावला हाच संदेश देण्यासाठी मी इतक्या लांबून मतदानासाठी आले अशी प्रतिक्रिया अमृता देवकर यांनी व्यक्त केली.

चिंचवडमध्ये ८ ईव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड, मतदान रखडले

चिंचवडमध्ये एका मतदान केंद्रात ८ ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे या मतदान केंद्रांवर काहीकाळ मतदान थांबवावे लागले होते. निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांच्या पथकाने ईव्हीएम मशिन बदलल्या. त्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत पार पडली.

Exit mobile version