मुख्यमंत्री शिंदेंच्या फोननंतर MPSC च्या ४०० जागा वाढणार

मुख्यमंत्री शिंदेंच्या फोननंतर MPSC च्या ४०० जागा वाढणार

शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून सरकार ऍक्शन मोडमध्ये आले आहे. अशातच एका विद्यार्थ्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क करून तक्रार केली. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी तक्रारीची दखल घेतली आहे. पुण्यातील एका विद्यार्थ्याने मुख्यमंत्री शिंदे यांना मोबाईलवरून लोकसेवा आयोगाच्या अपुऱ्या जागांबद्दल कल्पना दिली आणि मुख्यमंत्र्यांना केलेल्या एका कॉलमुळे राज्यसेवेच्या ४०० जागांमध्ये वाढ झाली आहे.

राज्यसरकारच्या विविध विभागांनी मागणीपत्र दाखल न केल्यामुळे, राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेतील जागांची संख्या कमी होती. केवळ सहा विभागातील १६१ जागांचे परिपत्रक काढण्यात आले होते. उर्वरित विभागाचे मागणीपत्रच सामान्य प्रशासन विभाग अथवा एमपीएससीला मिळाले नाही.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात लख्ख ‘उजाला’; राज्यात २.२ कोटी एलईडी बल्बचे वितरण

नामांतराच्या निर्णयांना स्थगिती

पंजाबी गायक दलेर मेहंदीला अटक, २ वर्षाचा तुरुंगवास

संसाराचा त्याग करून भगवे झाले जितेंद्र नारायण त्यागी

अपुऱ्या जागा आणि पुढील वर्षी बदललेल्या अभ्यासक्रमांमुळे अनेक विद्यार्थ्यांची संधी हुकणार आहे, अशी माहिती ललित पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन करून दिली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली आणि सुमारे ४०० जागांची वाढ झाली आहे. “आमच्या मागणीची तातडीने दखल घेत, संबंधित विभागाला निर्देश दिले असून, सुमारे ४०० जागांमध्ये वाढ होणार असल्याचे कळविण्यात आले आहे,” अशी माहिती ललित पाटील यांनी दिली.

Exit mobile version