२०२४ ला नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान!

खासदार गजानन कीर्तिकर यांचे भाकीत

२०२४ ला नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान!

मी  चार दशकांपेक्षा जास्त वर्ष बाळासाहेबांसोबत काम केलं. त्यांनी मला अनेक पदं दिली. उद्धव ठाकरे यांच्या काळात मला तीन वेळा उमेदवारी मिळाली. कारण माझी उमेदवारी कापण्याची त्यांची आणि कोणाचीच लोकांची हिंमत नव्हती. पण बाळासाहेब गेल्यानंतर माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला त्यांनी बाजूला सारलं. मागील वर्षी एकनाथ शिंदे यांनी जेव्हा उठाव केला. तेव्हा मी त्यांच्यासोबत जायचं ठरवलं, असे विधान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर यांनी म्हटले आहे.

२०२४ मध्ये एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील  आणि नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असतील अशी आमची जिद्द आहे असं भविष्य शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी वर्तवलं आहे. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.मालाड येथे एका कार्यक्रमात संवाद साधताना गजानन कीर्तिकर यांनी हे भाकीत वर्तवलं आहे. तसेच शिवसेना का सोडली? याचं कारण सांगतानाच मनातील आपली खदखदही कीर्तिकर यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली . रा

ज्यातील ४० पैकी २० महापालिका आपण जिंकणार आहोत. असा दावा त्यांनी यावेळेस केला आहे.मुंबई महापालिकेवर बाळासाहेबांची शिवसेनेचाच महापौर बसणार आहे,असेही ते पुढे म्हणाले.

हे ही वाचा:

पद्म पुरस्कारांचा दाखला देत मोदींनी केले आदिवासी समाजाचे कौतुक

शनि शिंगणापूरला १ कोटीचे दान करणारे ओदिशाचे मंत्री नबा दास गोळीबारात मृत्यूमुखी

पवारांच्या भाकितांचे रहस्य काय?

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणतात, मी हिंदूच!

मी ४५ वर्ष बाळासाहेबांसोबत काम केलं. त्यांनी मला अनेक पदं दिली. उद्धव ठाकरे यांच्या काळात मला तीनदा उमेदवारी मिळाली. पण बाळासाहेब गेल्यानंतर माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला त्यांनी बाजूला सारलं.   खोक्यांसाठी ४० आमदारांनी बंड केलं नाही. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन आपली विचारधारा बदललीआहे.त्यामुळे आमदारांनी शिवसेनेला वाचवण्याचं काम केलं. सर्वात आधी शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. माझ्या मनातही कुठे ना कुठे खदखद होती. त्यामुळे मीही बाहेर पडलो, असं त्यांनी यावेळेस सांगितलं.

Exit mobile version