नवी दिल्लीत लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. अधिवेशनात सोमवारी कामकाज सुरू असताना हातात फलकबाजी केल्या प्रकरणी सभापती ओम बिर्ला यांनी काॅंग्रेसच्या चार खासदारांना पूर्ण अधिवेशन काळासाठी निलंबित करण्याचे आदेश दिले. अगाेदर या चार सदस्यांना त्यांच्या वर्तनाबद्दल इशारा देताना सभापती ओम बिर्ला यांनी महागाई विराेधात निषेध करायचा असल्यास संसदेच्या बाहेर फलकबाजी करा, असा आदेशही दिला हाेता.
या खासदारांच्या वर्तनामुळे नाराज झालेल्या लाेकसभा सभपतींनी आपण दुपारी ३ वाजल्यानंतर चर्चेसाठी तयार आहाेत. पण सभागृहात निषेधाचे फलक सहन केले जाणार नाहीत. माझ्या दयाळूपणाला कमजाेरी समजू नका, असेही सांगितले हाेते. त्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
दुपारी ३ वाजता सभागृहाचे कामकाज सुरू झाले. पण त्या आधी शून्य प्रहरात सभागृहाचे कामकाज २० मिनिटे तहकूब करण्यात आले हाेते. परंतु हे खासदार पुन्हा फलक घेऊन सभागृहात परतले. त्यानंतर सभापतींनी सभागृहाचे कामकाज मंगळवार २६ जुलै सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब केले.
हे ही वाचा:
पुण्यात शिकाऊ विमान शेतात कोसळलं, पायलट जखमी
“आदिवासी मुलगी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहचते हे लोकशाहीचे सामर्थ्य”
मै द्रौपदी मुर्मू….. देशाच्या १५ व्या राष्ट्रपतींनी घेतली शपथ!
ऑगस्ट महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद!
या चार खासदारांचे निलंबन
मणिकम टागोर, जोथिमणी, रम्या हरिदास आणि टीएन प्रतापन अशी या चार निलंबित काँग्रेस खासदारांची नावे आहेत.
खासदारांवर कारवाईची मागणी
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी विरोधी खासदारांच्या वर्तनाचा निषेध करत कामकाज सुरळीत चालण्यासाठी सभागृहात फलक घेऊन आलेल्या खासदारांवर कारवाई करण्याची विनंती सभापतींना केली.