परमबीर सिंग यांच्याविरोधात तिसरे अजामीनपात्र वॉरंट जारी

परमबीर सिंग यांच्याविरोधात तिसरे अजामीनपात्र वॉरंट जारी

मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात स्थानिक न्यायदंडाधिकारी न्यायालयाने बुधवारी (१० नोव्हेंबर) मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. परामबीर सिंग यांच्याविरुद्ध जारी करण्यात आलेले हे तिसरे अजामीनपात्र वॉरंट आहे.

यापूर्वीही मुंबईतील गोरेगाव आणि ठाणे जिल्ह्यात दाखल झालेल्या खंडणीच्या दोन गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. २२ जुलै २०२१ रोजी रिअल इस्टेट बिल्डर श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीनुसार मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात परमबीर सिंग आणि इतर सात जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर. एम. नेर्लीकर यांनी याप्रकरणी बुधवारी सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्राच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) यापूर्वी भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्याची मागणी केली होती.

विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी यापूर्वी न्यायालयाला सांगितले होते की, परामबीर सिंग यांनी मुंबई पोलिसांची खराब प्रतिमा निर्माण केली आहे. ‘परमबीर सिंगच्या या वाईट वागणुकीमुळे मुंबई पोलिस आणि इतरांची वाईट प्रतिमा निर्माण झाली आहे,’ असेही ते म्हणाले होते.

हे ही वाचा:

पराभवाच्या भीतीने शिवसेनेला हुडहुडी भरली

महानगरपालिकेत आता २२७ ऐवजी २३६ वॉर्ड

२६ नोव्हेंबरपासून पुन्हा दिल्लीत ट्रॅक्टर रॅली?

अनियंत्रित परदेशी देणग्यांचा वापर राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये

एफआयआरमध्ये परमबीर सिंग आणि इतर सात जणांची नावे आहेत. त्यात पाच पोलिस अधिकारी असून पोलिस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके या दोन आरोपींना सोमवारी अटक करण्यात आली. दोघांनाही मंगळवारी सात दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

Exit mobile version