महाराष्ट्रासारखा राजकीय भूकंप इंग्लंडमध्ये, जॉन्सन सरकारमधील ३९ मंत्र्यांचा राजीनामा

महाराष्ट्रासारखा राजकीय भूकंप इंग्लंडमध्ये, जॉन्सन सरकारमधील ३९ मंत्र्यांचा राजीनामा

इंग्लंडमध्ये राजकीय संकट निर्माण झाल असून पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अवघ्या ४८ तासात पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या मंत्रीमंडळातील तब्बल ३९ मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे ब्रिटनमध्ये बोरिस जॉन्सन यांच्या सरकारसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे.

मागील ४८ तासांत पाच कॅबिनेट मंत्र्यांसह ३९ मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यातच पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर पंतप्रधान पद सोडण्याचा दबाव वाढला आहे. कालच  ब्रिटनचे आरोग्य सचिव साजिद जविद आणि अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

आरोग्यमंत्री साजिद जाविद आणि भारतीय वंशाचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी राजीनामा देताच बुधवारी आणखी मंत्र्यांनी राजीनामे दिला आहे. निर्यात आणि समानता मंत्री माईक फ्रीर, सुरक्षा सचिव रॅचेल मॅक्लीन, वित्तीय सेवा सचिव जॉन ग्लेन, शिक्षण विभागाचे कनिष्ठ सचिव अ‍ॅलेक्स बुरघर्ट, गृहनिर्माण कनिष्ठ मंत्री नील ओब्रायन यांच्यासह ३९ जणांनी राजीनामे दिले आहे.

हे ही वाचा:

शिवसेनेला खिंडार; ठाण्याचे ६६ माजी नगरसेवक मुख्यमंत्री शिंदेंच्या बाजूने

नवलानी प्रकरणी संजय राऊतांना दणका; किरीट सोमय्यांना दिलासा

माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा

मुख्यमंत्री भगवंत मान बनणार ‘दुल्हेराजा’

ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी स्वतः ट्वीट करून राजीनामा देत असल्याची माहिती दिली होती. “सरकार योग्य, गांभीर्याने आणि सक्षमपणे चालवले जाईल, अशी जनतेची अपेक्षा असते. मंत्री म्हणून ही माझी शेवटची नोकरी असू शकते. परंतु, मला विश्वास आहे की, हे कारण लढण्यासाठी योग्य आहे. त्यामुळेच मी राजीनामा देत आहे,” असे ट्विट त्यांनी केलं होते. या राजकीय भूकंपामुळे आता जॉन्सन आपले पद सोडणार का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Exit mobile version