केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज संध्याकाळी ६ वाजता झाला. केंद्र सरकारने मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या ४३ नेत्यांची यादी जाहीर केली. महाराष्ट्रातून नारायण राणे, भागवत कराड, भारती पवार आणि कपिल पाटील या चार नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
दिल्लीत आज सकाळपासूनच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ७ रेसकोर्स हे निवासस्थान या राजकीय घडामोडींचं केंद्र बनलं आहे. ज्या संभाव्य नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. त्यांच्याशी मोदींनी आज संवाद साधला. सरकारची कामे, देशाची आणि राज्यांची परिस्थिती, आव्हाने आणि नव्या मंत्र्यांकडून असलेल्या अपेक्षा याबाबत मोदींनी संभाव्य मंत्र्यांशी संवाद साधला.
नारायण राणे, सर्बानंद सोनोवाल, डॉ. विरेंद्र कुमार, ज्योतिरादित्य सिंधिया, रामचंद्र प्रसाद सिंग, अश्विनी वैष्णव, पशुपती कुमार पारस, किरेन रिजीजू, राजकुमार सिंह, हरदीप सिंह पुरी, मनसुख मंडाविया, भुपेन्द्र यादव, पुरुषोत्तम रुपाला, जी. किशन रेड्डी, अनुराग सिंह ठाकूर, अनुप्रिया सिंह पटेल, डॉ. सत्यपाल सिंह बघेल, राजीव चंद्रशेखर, शोभा करंदलाजे, भानूप्रताप सिंग वर्मा, दर्शना विक्रम जरदोष, मीनाक्षी लेखी, अनपुर्णा देवी, ए. नारायण स्वामी, कौशल किशोर, अजय भट्ट, बी. एल. वर्मा, अजय कुमार, चौहान देवूसिंह, भागवत खुपा, कपिल पाटील, प्रतिमा भौमिक, डॉ. सुभाष सरकार, डॉ. भागवत कराड, डॉ. राजकुमार सिंह, डॉ. भारती पवार, बिस्वेश्वर तडू, शंतनु ठाकूर, डॉ. मुंजपारा महेंद्रभाई, जॉन बरला, डॉ. एल. मुरगन, निसित प्रमाणिक हे मंत्री शपथ घेणार आहेत.
हे ही वाचा:
१५ जुलैपासून ग्रामीण भागात शाळा सुरु?
ठाकरे सरकारमुळे ओबीसी आरक्षण गेले
महाराष्ट्रातील हे नेते मोदी मंत्रिमंडळात निश्चित?
शपथविधी सोहळ्यात ४३ मंत्र्यांना शपथ दिली गेली. सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात ५३ मंत्री आहे, ही संख्या वाढून ८१ होणार आहे.