ठाकरे सरकारच्या काळात कोण खुष आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणारे पोलिस खातेही ठाकरे सरकारवर नाखुष आहे. महाविद्यालयीन युवतीने तयार केलेल्या अहवालातून पोलिसांच्या बाबतीमधील धक्कादायक खुलासे आता समोर आलेले आहेत.
या अहवालानुसार जळपास ३२ टक्के पोलिसांचे मनोधैर्य हे खचलेले आहे. तसेच ४० टक्के पोलिस एकूणच सरकारच्या कामगिरीबद्दल नाराज आहेत. फ्रंट वर्कर म्हणून काम करणारे पोलिस आजही लसीविना काम करताना दिसत आहे. पोलिस प्रशासनासाठी ठाकरे सरकारने लसीची सोयही अजून केलेली नाही. महिला पोलिसांचे प्रश्न यापेक्षा वेगळे आहेत. त्यांनाही कामावर हजर राहावे लागत असल्यामुळे कुटुंबाकडेही दुर्लक्ष होत आहे. खासकरून टाळेबंदीच्या काळात महिला पोलिसांनी कुटुंब आणि नोकरी हे संतुलन राखणे फारच कठीण गेल्याचे समजते.
हे ही वाचा:
पुण्यात घरांच्या तोडकामावरून सुप्रिया सुळे-अजित पवार आमनेसामने
बंगलोसेनेतील अजून एका नेत्याचा अनधिकृत बंगला?
रेस ट्रॅकवर गाड्या का आणल्या? याचे थक्क करणारे स्पष्टीकरण
रिक्त पदांच्या प्रश्नावर राज्य अधिकारी महासंघ संपाच्या तयारीत
पोलिसांना अजूनही विमा संरक्षण तसेच इतर अनेक सुविधा न मिळाल्यामुळे पोलिसांच्या कुटूंबियांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. एकूणच शासनाकडून देण्यात येणारी सुविधा ही अतिशय तुटपुंजी असल्याचे मत अनेक पोलिसांचे आहे. टाळेबंदीच्या काळातही पोलिस अहोरात्र रस्त्यावर काम करत होते. तरीही त्यांच्या वाट्याला ठाकरे सरकारकडून केवळ उपेक्षाच आलेली आहे.
खासकरून कोरोनाकाळातील एकूणच कामकाजाविषयी पोलिसांनी नाराजी व्यक्त केली. ५१ ते ६० वर्षे वयोगटातील पोलिसांमध्ये कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर आढळले आहे. तसेच मुख्य म्हणजे पोलिसांना शासनाकडून फार सुविधाही देण्यात येत नसल्यामुळे एकूणच नाराजी दिसून येत आहे.
आपल्या जीवाचे रान करून पोलिस कामावर हजर राहतो. पण सरकारकडून साधी लस मिळू नये यासारखे दुर्दैव नाही.