राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याने राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन होऊ शकतो, असे संकेत काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, कोणत्याच उपायाला यश येताना दिसत नाही. परिणामी लोकांचे जीव वाचवण्यासाठी काही दिवसांचा कडक लॉकडाऊन गरजेचा असल्याचे सूतोवाच विजय वडेट्टीवार यांनी केले.
नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी तीन आठवड्यांचा लॉकडाऊन अपरिहार्य आहे. मी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आजच विनंती करणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील लोकल ट्रेनच्या प्रवासावर पुन्हा एकदा निर्बंध आणण्याची शक्यता बोलून दाखवली. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणती नवी घोषणा करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आगामी दहा दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा हा दहा लाखांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील लोकांचे जीव वाचवण्याची गरज आहे. त्यामुळे विरोधकांनी यावरुन राजकारण करु नये. गेल्या महिन्यात एमपीएससीची परीक्षा रद्द झाली तेव्हा भाजपाचे नेते रस्त्यावर उतरले. आतादेखील भाजपाकडून व्यापाऱ्यांना आंदोलन करण्यासाठी चिथावले जात असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
हे ही वाचा:
आता संपूर्ण लॉकडाऊनची गरज नाही
१४९ जिल्ह्यांमध्ये एकही नवीन कोरोना रुग्ण नाही
एमपीएसी परीक्षा पुढे ढकला, राज ठाकरेंची मागणी
आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला आजपासून सुरवात
परंतु सर्वाधिक केसेस या महाराष्ट्रातच का आहेत? आवश्यक बेड आणि व्हेंटीलेटरचा तुटवडा महाराष्ट्रात का आहे? महाराष्ट्रातच लॉकडाऊनची वेळ का आली? या प्रश्नांवर वडेट्टीवार यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.