जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी मंगळवारी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
गेल्या ३६ तासांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधातील ही पाचवी कारवाई आहे. दहशतवाद्यांकडून करण्यात येणाऱ्या हिंदू, शीख नागरिकांच्या हत्येविरोधात पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे. गेल्या आठवड्यात ४८ तासांच्या कालावधीत पाच हिंदू, शीख नागरिकांची हत्या करण्यात आली होती.
#ShopianEncounterUpdate: Out of 03 killed #terrorists, one terrorist has been identified as Mukhtar Shah of #Ganderbal, who shifted to #Shopian after killing one street hawker Virendra Paswan of Bihar: IGP Kashmir@JmuKmrPolice https://t.co/0vgygLxLpr
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) October 11, 2021
काश्मीर पोलिसांनी म्हटले होते की, तीन दहशतवाद्यांना शोपियानमध्ये सोमवारी रात्री दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान झालेल्या चकमकीत गोळ्या घालून ठार करण्यात आले. यापैकी किमान एक दहशतवादी गेल्या आठवड्यात करण्यात आलेल्या हिंदू शीख नागरिकांच्या हत्येमध्ये सामील होता. पोलिसांनी सांगितले की, तिघांनाही आत्मसमर्पण करण्याची संधी देण्यात आली होती पण त्यांनी तसे करण्यास नकार दिला.
पोलिसांनी असेही सांगितले की हे तिघे द रेझिस्टन्स फ्रंटचे सदस्य आहेत, जी लष्कर-ए-तैयबाचीच एक उपसंघटना आहे. पालिसांना खात्री आहे की या हत्येमागे हीच संघटना कार्यरत आहे. आसपासच्या परिसरात शोधमोहिम सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
“या दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे. शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्यासह गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले आहे. तपासादरम्यान इतर तपशील सांगण्यात येईल.” असे पोलिसांनी सांगितले.
या तिघांपैकी एक, गंदरबल जिल्ह्यातील मुख्तार शाह, मूळचा बिहारचा रहिवासी असलेल्या वीरेंद्र पासवानच्या हत्येशी जोडला गेला आहे. वीरेंद्र पासवान हा श्रीनगरमध्ये पाणी पूरी विक्रेता होता.
हे ही वाचा:
पाकिस्तानी दहशतवाद्याला केली दिल्लीत अटक
जळगावात फुकटसेनेच्या ‘रणरागिणींचा’ भलताच प्रताप
वाहतूक नियम मोडणाऱ्यांना लावणार जबरदस्त ‘ब्रेक’
एनसीबी संचालक वानखेडे यांच्या मागावर गुप्तहेर
पोलिसांनी काल असेही म्हटले होते की, इम्तियाज अहमद दार या आणखी एका दहशतवाद्याला बंदीपूरच्या हाजीन भागात गोळ्या घालून ठार करण्यात आले आणि त्याच्या चार साथीदारांना अटक करण्यात आली.