27 C
Mumbai
Monday, December 30, 2024
घरराजकारणलागा तयारीला; तीन लोकसभा आणि ३० विधानसभा पोटनिवडणुका होणार

लागा तयारीला; तीन लोकसभा आणि ३० विधानसभा पोटनिवडणुका होणार

Google News Follow

Related

भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) मंगळवारी ३० ऑक्टोबर रोजी तीन लोकसभा आणि ३० विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. महामारी, महापूर, सण, त्या त्या क्षेत्रातील परिस्थिती आणि कोविड महामारीचा आढावा घेऊन निवडणुकांचे वेळापत्रक ठरवले गेले आहे.

लोकसभा पोटनिवडणूक दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, या केंद्रशासित प्रदेशात होणार आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेश (खंडवा) आणि हिमाचल प्रदेश (मंडी) मधील प्रत्येकी एका जागेवर होणार आहे. आंध्र प्रदेश, हरियाणा, मिझोराम, महाराष्ट्र, नागालँड आणि तेलंगणा या प्रत्येकी एका मतदारसंघात विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे; कर्नाटक, बिहार आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी दोन; हिमाचल प्रदेश, मेघालय आणि मध्य प्रदेशात प्रत्येकी तीन; पश्चिम बंगालमध्ये चार; आणि आसाममध्ये पाच जागांवर निवडणूक होणार आहेत.

कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर पोटनिवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. महामारी दरम्यान मतदान आयोजित करण्यासाठी ईसीआयची मार्गदर्शक तत्त्वे ३० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकांना लागू होतील आणि निवडणूक प्रचारादरम्यान सभांमध्ये सहभाग आणि मास्क, सॅनिटायझर आणि हातमोजे वापरणे बंधनकारक असेल.

हे ही वाचा:

पंजाबमध्ये भाजपाला ‘कॅप्टन’ मिळणार?

९१ वर्षांची सुरे’लता’

योगी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार! सात नव्या चेहऱ्यांना संधी

आज जागतिक नदी दिवस; पण मुंबईतील नद्या मरणपंथाला!

ईसीआयने या महिन्याच्या सुरुवातीला ३० सप्टेंबरला (गुरुवारी) चार विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली. त्यात पश्चिम बंगालच्या भबानीपूरचा समावेश आहे, जिथे ममता बॅनर्जी निवडणूक लढवत आहेत कारण त्यांना मुख्यमंत्रिपदावर कायम राहण्यासाठी नोव्हेंबरपर्यंत विधानसभेवर निवडून येणे आवश्यक आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा