भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह हे शनिवारी रात्री कालवश झाले. त्यांच्या निधनाने सारा देश हळहळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या सर्वांनीच त्यांना आदरांजली वाहिली असून उत्तर प्रदेश राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कल्याण सिंह यांची प्रकृती चिंताजनक असून लखनऊ येथील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे उपचार सुरु होते. शनिवारी रात्री त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यासोबत उत्तर प्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह हे देखील होते.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानातील भारतीय सुखरूप! कोणाचेही अपहरण नाही
हिंदुत्वाचे महामेरू कल्याण सिंह कालवश
मनसुख हिरेन नंतर कळवा खाडीत सापडला आणखीन एका उद्योजकाचा मृतदेह
कल्याण सिंह यांच्या निधनाने देश हळहळला
कल्याण सिंह यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेश सरकारकडून राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तर प्रति वर्षी २३ ऑगस्ट या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
आज म्हणजेच रविवार, २२ ऑगस्ट रोजी कल्याण सिंह यांचे पार्थिव उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. तर नंतर ते कल्याण सिंह यांच्या जन्मस्थळ असलेल्या अलिगड जिल्ह्यात आणले जाणार आहे. अलिगड येथील एका स्टेडियम मध्ये त्यांचे पार्थिव नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. सोमवारी त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या अतरौली येथे त्यांचे पार्थिव आणले जाणार आहे. तर बुलंदशहर जिल्ह्यातील नरोरा येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.