जेव्हा शरद पवारांच्या सरकारने केलेला गोवारी समाजावर लाठीचार्ज!

जेव्हा शरद पवारांच्या सरकारने केलेला गोवारी समाजावर लाठीचार्ज!

नागपूर येथे घडलेल्या गोवारी हत्याकांडाला आज २७ वर्ष पूर्ण होत आहेत. १९९४ साली महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी ही घटना घडली होती. नागपूर येथे महाराष्ट्र सरकारचे अधिवेशन सुरु असतानाच गोवारी बांधवांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. आज २७ वर्ष उलटून गेली तरी गोवारी समाजाच्या या जखमा भरून निघालेल्या नाहीत.

नेमके काय घडले?
महाराष्ट्रातील गोवारी समाज हा आरक्षणाची मागणी करत होता. अनुसूचित जमातीमध्ये गोवारी समाजाला सामावून घेण्यात यावे आणि आरक्षण दिले जावे अशी मागणी गोवारी समाजातर्फे करण्यात आली होती. गोवारी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे आरक्षण महत्वाचे होते. त्यांना शिक्षणात, सरकारी नोकरीमध्ये संधी मिळवण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे होते.

त्यामुळे याच मागणीच्या अनुषंगाने गोवारी समाज नागपूरमध्ये एकत्र जमला होता. महाराष्ट्र सरकारचे हिवाळी अधिवेशन त्यावेळी भरले होते. शरद पवार हे तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. गोवारी समाज राज्य सरकारच्या अधिवेशनावर मोर्चा घेऊन गेला होता. या मोर्चासाठी राज्यभरातून हजारो गोवारी समाजाचे नागरिक रस्त्यावर उतरले होते. नागपूर येथे एकत्र आले होते.

हे ही वाचा:

ईडी म्हणते, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुखांना मुलाची साथ

पेंग्विन पुन्हा ‘हाय- वे’च्याच हवाली!

खड्ड्यांमुळे रायफलमधून गोळी सुटली आणि जवानाचा गेला प्राण

अनिल परबांच्या घरावर फेकली शाई

पण यातल्या मागण्यांना घेऊन आक्रमक झालेल्या गोवारी समाजावर लाठीचार्ज करण्यात आला. या लाठीचार्जमध्ये एकाच गोंधळ उडाला. मोर्चात सहभागी झालेले पुरुष, महिला, लहान मुले सर्वच सैरावैरा पळू लागले. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात चेंगरा चेंगरी झाली. यामध्ये ११४ गोवारींना आपले प्राण गमवावे लागले होते. आज या घटनेला आज २७ वर्ष पूर्ण होत आहेत. पण आजही या हुतात्म्यांना योग्य तो न्याय मिळालेला नाही.

Exit mobile version