27 C
Mumbai
Monday, December 30, 2024
घरराजकारणखुशखबर!! ओबीसींसाठी इथे असतील २७ टक्के जागा...

खुशखबर!! ओबीसींसाठी इथे असतील २७ टक्के जागा…

Google News Follow

Related

मोदी सरकारने गुरुवारी एका महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा केली. हा निर्णय ओबीसी समाजातील तसेच आर्थिक मागास गटातील मुलांसाठी आनंददायी आहे.

मेडिकल शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी आज मोदी सरकारतर्फे ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. मेडिकलच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातल्या ऑल इंडिया कोटातल्या जागांमध्ये ओबीसींसाठी २७ टक्के तर ईडब्लूएस प्रवर्गासाठी १० टक्के आरक्षण जाहीर करण्यात आलंय. हा निर्णय २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी लागू असणार आहे.

या निर्णयमुळे मेडिकल तसेच डेंटल अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या ओबीसी आणि अर्थिक मागास घटकातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. या निर्णयाचा फायदा ५,५५० होणार असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया म्हणाले आहेत.

मोदी सरकारनं ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केलीय. मेडिकलच्या कोर्समध्ये ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षणाची घोषणा सरकारच्यावतीनं करण्यात आलीय. २०२१-२२ वर्षासाठी हे आरक्षण लागू असेल. ओबीसी तसच ईडब्लूएस अशा दोन्ही वर्गांना ह्या आरक्षणाचा लाभ होईल. यात अंडरग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल/डेंटल कोर्समध्ये ओबीसींना २७ टक्के तर ईडब्लूएसच्या विद्यार्थ्यांना १० टक्के रिजर्वेशनचा फायदा मिळेल. ह्या आरक्षणाचा फायदा ऑल इंडिया कोटा स्कीमच्या माध्यमातून मिळेल.

हे ही वाचा:

कुठली भाषा वापरावी हे अजितदादांनी सांगावं म्हणजे राज कुंद्रांनी कुठला चित्रपट बघावा हे सांगण्यासारखं

काय आहे राकेश झुनझुनवाला आणि अकासा एरलाईन्स कनेक्शन?

पेगासिसची चिंता सोडा ‘पेंग्वीनची’ चिंता करा

‘ही’ अट मान्य केली, तर टेस्लाच्या गाड्या स्वस्त होणार

एका रिपोर्टनुसार-जवळपास ५ हजार ५५० विद्यार्थ्यांना मोदी सरकारच्या ह्या निर्णयाचा फायदा होईल. दरवर्षी एमबीबीएसच्या दीड हजार ओबीसी विद्यार्थ्यांना तर पोस्ट ग्रॅज्युएट करणाऱ्या २५०० ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ मिळेल. तर ईडब्लूएसच्या आरक्षणाचा लाभ एमबीबीएसमध्ये ५५० तर पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये १००० विद्यार्थ्यांना आरक्षण मिळेल. विशेष म्हणजे सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये एकूण जागांच्या १५ टक्के जागा ह्या अँडरग्रॅज्युएट तर पोस्ट ग्रॅज्युएटच्या ५० टक्के सीटस् ह्या ऑल इंडिया कोट्यात येतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा