उत्तर प्रदेशातील एटा येथे १० ख्रिस्ती कुटुंबातील ३५ जणांनी घरवापसी केली असून त्यांनी हिंदूधर्मात प्रवेश केला आहे. हिंदू धर्मात आलेल्या या कुटुंबाना प्रथम हवन करावे लागले आणि नंतर गंगामातेचे पाणी शिंपडून त्यांना हिंदू धर्मात प्रवेश दिला गेला.
या कुटुंबांतील सदस्यांनी सांगितले की, २७ वर्षांपूर्वी त्यांना फसवून, आमिषे दाखवून ख्रिस्ती धर्मात आणण्यात आले होते. पण जवळपास अडीच दशकांनंतर ही सगळी कुटुंबे पुन्हा एकदा हिंदू धर्मात आली आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार हिंदू एकता ग्रुपने या धर्मांतरित केलेल्या लोकांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासाठी प्रयत्न केले. एकता ग्रुपने एक परिसंवादाचे आयोजन करून त्यात हिंदू धर्माविषयी माहिती दिली.
हे ही वाचा:
‘आपला पेहराव योग्य, उचित असावा एवढे सामाजिक भान बाळगले पाहिजे’
भिवंडीत ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे लावणाऱ्यांना अटक
अमेय घोले उद्धव गटाकडून शिंदे गटाच्या वाटेवर?
गेल्या महिन्यात २० वाल्मिकी कुटुंबांपैकी १०० सदस्यांनी घरवापसी केली. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये ही घरवापसी झाली होती. राष्ट्रीय चेतना मिशनने वाल्मिकी संघासोबत स्थानिक आमदार मीनाक्षी सिंग यांच्या मदतीने घरवापसीचा कार्यक्रम घेतला.
सिंग यांनी सांगितले की, ज्यांनी हिंदू धर्मात प्रवेश केला त्यांनी प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण इत्यादिंचे पूजन करण्याची शपथ घेतली आहे. १९९५मध्ये या सर्वांना ख्रिस्ती धर्मात आणले गेले होते. मिशनऱ्यांनी त्यांच्या कुटुंबांना ख्रिस्ती धर्मात सक्तीने धर्मांतरित केले होते. पण आता त्यांना पश्चात्ताप झालेला आहे. जरानिकलान गावातील ही कुटुंबे हिंदू धर्मात येऊ इच्छित होती. पथवारी माता देवळात ही प्रक्रिया पूर्ण झाली.