एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. पण उल्हासनगरात मात्र अत्यंत उल्हासी वातावरण आहे. एमएमआरडीएने तेथे बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि मिनी स्टेडियम उभारण्यासाठी २५ कोटी रुपयांचा जादा निधी मंजूर केला आहे.
येथे उभारण्यात येणारे हे स्मारक, स्टेडियम तसेच रस्त्यांसाठी एकूण ७४ कोटी ७८ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यातून २५ कोटींचा निधी मिळाला आहे. त्यावरून भाजपाने जोरदार टीका केली आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता असताना निव्वळ टक्केवारीसाठी जनतेच्या पैशांचा हा अपव्यय चालला आहे, अशी टीका करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
मराठा मोर्चापूर्वी १५ जूनला ओबीसी मोर्चा
कोव्हिशिल्डची किंमत ७८०, तर कोव्हॅक्सिन १४१० ला
मुळशीमधील कंपन्यांत घुसून पाहणी करु
पाकीटमारांना सापडले हिरे, पण हाती पडल्या बेड्या… कशामुळे?
उल्हासनगर शहरात खेळाडूंसाठी मैदानांची वानवा आहे आणि त्यामुळे इथले खेळाडू अन्य शहरात सरावासाठी जातात हे लक्षात घेऊन तिथे मिनी स्टेडियम उभारण्याचा हेतू आहे. या स्टेडियममध्ये स्मारक, विविध सुविधांसाठी दोन वर्षांपूर्वीच महापालिकेकडून १२ कोटींचा निधी तसेच नगरोत्थानमधून १० कोटींचा निधी मंजूर झाला होता. आता त्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
येथे असलेल्या व्हीटीसी मैदानाच्या जागेवर हे स्टेडियम उभारण्यात येईल. त्यात व्हॉलीबॉल कोर्ट, उपाहार गृह, बॅडमिंटन कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, ४०० मीटरची धावपट्टी, जलतरण तलाव, थिएटर अशी व्यवस्था असेल. या सगळ्या व्यवस्थांचा कसा उपयोग पुढे होणार आहे, हे पाहावे लागेल.
कोरोनाने महाराष्ट्रात १ लाखावर बळी घेतले असताना MMRDAने उल्हासनगरात बाळासाहेब ठाकरे स्टेडियम उभारण्यासाठी २५ कोटी रुपयांचा जादा निधी मंजूर केलाय. तिसऱ्या लाटेची शक्यता असताना निव्वळ टक्केवारीसाठी जनतेच्या पैशाचा असा हा अपव्यय चालला आहे.@OfficeofUT #MahaVasooliAaghadi pic.twitter.com/jV1tyRWnU3
— BJP MUMBAI (@bjp4mumbai) June 9, 2021
मध्यंतरी उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळून अनेकांचा मृत्यू झाला होता. तसेच ५०० इमारती या निकृष्ट दर्जाच्या असल्याचा अहवालही समोर आला होता. ही परिस्थिती सुधारण्याऐवजी नवे प्रकल्प हाती घेत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.