गुजरात मधील भाजपाचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा हा गुरुवार, १६ सप्टेंबर रोजी पार पडला आहे. गांधीनगर येथील राजभवनात पार पडलेल्या या शपथविधी कार्यक्रमात २४ आमदारांनी गुजरात राज्याचे मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. पण या चोवीस नावांमध्ये एकही नाव आधीच्या विजय रूपाणी यांच्या सरकारमध्ये मंत्री नव्हते. म्हणजेच सर्वच्या सर्व नवीन चेहर्यांना भाजपाकडून मंत्री म्हणून संधी देण्यात आली आहे. भाजपाच्या या निर्णयामुळे मोदी-शहांच्या धक्कातंत्रची मालिका ही सुरूच आहे.
गुजरात निवडणूक अवघी वर्षभरावर येऊन ठेपलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी ही निवडणूक फारच प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा कडून करण्यात आलेला हा बदल म्हणजे खूप धाडसाचे मानले जात आहे. भूपेंद्र पटेल सरकारमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या मंत्र्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत. या नावांमध्ये विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी आणि भाजपाचे माजी गुजरात प्रदेशाध्यक्ष जितेंद्र वघानी यांच्या नावांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
फ्रान्सने आयएसआयएस प्रमुखाला संपवले
अभिनेत्याच्या जाचाला कंटाळून शरीरसौष्ठवपटू मनोज पाटीलची आत्महत्या
स्वातंत्र्यवीर सावरकर नव्हे, नेहरूच होते माफीवीर!
तब्बल १४ वर्षांनंतर त्याच्या शिक्षेत केली वाढ! काय घडले वाचा…
गुजरातचे नवे मंत्री
1. राजेंद्र त्रिवेदी
2. जितेंद्र वघानी
3. ऋषिकेश पटेल
4. पूर्णश कुमार मोदी
5. राघव पटेल
6. उदय सिंह चव्हाण
7. मोहनलाल देसाई
8. किरीट राणा
9. गणेश पटेल
10. प्रदीप परमार
11. हर्ष सांघवी
12. जगदीश ईश्वर
13. बृजेश मेरजा
14. जीतू चौधरी
15. मनीषा वकील
16. मुकेश पटेल
17. निमिषा बेन
18. अरविंद रैयाणी
19. कुबेर ढिंडोर
20. कीर्ति वाघेला
21. गजेंद्र सिंह परमार
22. राघव मकवाणा
23. विनोद मरोडिया
24. देवा भाई मालव