विधानपरिषदेचा निकाल लागल्यांनंतर एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल होते. त्यानांतर ते गुजरातमधील सुरतमध्ये मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर आली. आधी त्यांच्यासोबत तेरा आमदार असल्याचे सांगितले गेले त्यांनतर वीसहून अधिक आमदार त्यांच्यासोबत असल्याची माहिती समोर आली आहे.
आतापर्यंत एकनाथ शिंदेसह असलेल्या २२ आमदारांची नावे समोर आली आहेत. श्रीनिवास वनगा, महेश शिंदे, संदीपराव भूमारे,शांताराम मोरे, डॉ. संजय रायमूलकर,विश्वनाथ बोहीर,अनिल बाबर, रमेश बोरनारे,शहाजी पाटील,किशोर पाटील,चिमणराव पाटील,महेंद्र दळवी,प्रदीप जैस्वाल,शंभुराज देसाई,शानराज चौगुले, डॉ. बालाजी किणीकर,भरतशेठ गोगावले,संजय गायकवाड,सुहास कांदे,प्रकाश अबिटकर,तानाजी सावंत हे शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदेसोबत आहेत. यांच्याशिवाय राजकुमार पटेल अपक्ष आमदार हेदेखील त्यांच्यासोबत आहेत. आतापर्यंत
हे ही वाचा:
‘धर्मवीर’चे संकेत मुख्यमंत्र्यांना कळलेच नाहीत!
एकनाथ शिंदे नाराज असल्याचे राऊतांनी केले कबुल
एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे २८ आमदार फुटले
१३ आमदारांसह एकनाथ शिंदे नॉट रिचेबल; ठाकरे सरकार अडचणीत
दरम्यान, एकनाथ शिंदे अचानक गुजरातला दाखल झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड झाली आहे. त्यांनतर एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवण्यात आले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनीदेखील त्यांच्या ट्विटरवरून शिवसेनेचे नाव हटवले आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.