मुंबईच्या फुटपाथवरून जप्त केले २१ कोटीचे हेरॉईन आणि महिलेला केले जेरबंद

मुंबईच्या फुटपाथवरून जप्त केले २१ कोटीचे हेरॉईन आणि महिलेला केले जेरबंद

मुंबई शहर हे ड्रग्सच्या विळख्यात अडकले आहे. मुंबईत मागील काही वर्षापासून ड्रग्स (अमली पदार्थ) चा बेकायदेशीर धंदा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकट्या एनसीबीनेच नाही तर मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने या बेकायदेशीर धंद्यावर कारवाईचा बडगा उचलत मागील वर्षभरात अनेक ड्रग्स तस्कर, विक्रेते आणि ग्राहकाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून काही आठवड्यापूर्वी मुंबईत १६ कोटींचे ड्रग्स जप्त करण्यात आल्यानंतर सोमवारी अमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटने वडाळा ट्रक टर्मिनस येथील म्हाडा चाळीच्या फुटपाथवर केलेल्या कारवाईत २१ कोटी ६० हजार रुपये किंमतीचे हेरॉईन जप्त करून एका ५३ वर्षाच्या ड्रग्स डीलर महिलेला अटक केली आहे.

अमिना हमजा शेख उर्फ लाली असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. मानखुर्द च्या लाल्लूभाई कंपाउंड या ठिकाणी राहणारी अमिना उर्फ लाली हे सराईत ड्रग्स डीलर असून तिच्यावर यापुर्वी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत.
सायन कोळीवाडा या ठिकाणी एक महिला मोठ्या प्रमाणात ड्रग्स पुरवठा करीत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथक घाटकोपर युनिट च्या प्रभारी पोलीस निरीक्षक लता सुतार यांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे घाटकोपर युनिटचे पथक या महिलेच्या मागावर असताना या वडाळा ट्रॅक टर्मिनस या ठिकाणी असलेल्या म्हाडा चाळ फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ लपवण्यात आल्याची माहिती घाटकोपर युनिटच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे अमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटने म्हाडा चाळ फुटपाथ या ठिकाणी कारवाई करून सुमारे ७ किलो २००ग्रॅम हेरॉईन हा अमली पदार्थ जप्त केला आहे. याप्रकरणी अमीना उर्फ लाली हमजा शेख ला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईन ची किंमत २१ कोटी ६० लाख रुपये असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दत्तात्रय नलावडे यांनी दिली.

हे ही वाचा:

फेसबुकचे नव्याने बारसे होणार

जरंडेश्वर प्रकरणी सोमैय्यांची ईडीकडे तक्रार

फेसबुकचे नव्याने बारसे होणार

‘महापौरांचा बंगला हडप केल्यावर तरी स्मारक लवकर होईल, अशी आशा होती’

अटक करण्यात आलेल्या अमिना हिच्याकडे कसून चौकशी करण्यात आली असता तिने हा अमली पदार्थ राजस्थान राज्यातील प्रतापगढ जिल्ह्यातील नौगामा येथील ड्रग्स माफिया कडून विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे, हा अमली पदार्थ मुंबइतील किरकोळ विक्रेते, तसेच ड्रग्स सेवन करणाऱ्याना विक्री करण्यासाठी आणला गेल्याची माहिती अमिना हिने पोलिसांना दिली आहे.मुंबईतील या ड्रग्स विक्रेत्यांची नावे अमिनाच्या चौकशीत समोर आलेली असून त्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Exit mobile version