२९ जानेवारी रोजी राजधानी दिल्ली येथील इस्राएल दुतावासाबाहेर बॉम्ब स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता कमी असली आणि यात कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी दिल्लीतील एका अति महत्वाच्या भागात हा स्फोट झाल्याने त्याचे गांभीर्य अधिक आहे. पण दिल्लीत इस्राएल दूतावास बाहेर स्फोट होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या पूर्वी २०१२ साली याच ठिकाणी अशाच पद्धतीचा स्फोट घडवला गेला होता. २०१२ चा हा स्फोट म्हणजे इस्राएल राजदूतावरचा हल्ला होता आणि या गुन्ह्यासाठी एका पत्रकाराला अटक करण्यात अली होती. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही हीच कथा सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
हा पत्रकार नेमका कोण आहे? २०१२ च्या स्फोटात त्याने काय भूमिका बजावली होती? याच्या बचावला कोण कोण मैदानात आले होते? या सगळ्याचा लेखाजोखा या व्हिडिओमध्ये मांडला गेला आहे.
२९ जानेवारीच्या संध्याकाळी एकीकडे दिल्लीच्या विजय चौकात महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत बिटिंग रिट्रीट कार्यक्रम सुरु असताना दुसरीकडे त्यापासून अगदी काही किलोमीटर अंतरावर असलेल्या इस्राएल दूतावासाच्या परिसरात बॉम्बस्फोटाची घटना घडली. बॉम्बस्फोटाच्या स्थळी एक चिट्ठी सापडली आहे. या चिट्ठीमध्ये हा हल्ला केवळ ‘ट्रेलर’ असल्याची धमकी दिली आहे. त्याचबरोबर जानेवारी २०२० मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेलेला इराणचा लष्करी अधिकारी कासीम सुलेमानी याच्या हत्येचा हा बदला असल्याचेही सांगितले आहे.