संभाजीनगर नामकरणावरून काँग्रेसच्या २०० मुस्लिम पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

संभाजीनगर नामकरणावरून काँग्रेसच्या २०० मुस्लिम पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळात औरंगाबाद शहराच्या नामकरण प्रस्तावाला मंजुरी दिली. औरंगाबादचे नाव संभाजीनगर केले आहे. या नामांतराचे पडसाद औरंगाबादमध्ये उमटत आहेत. नामांतरानंतर काँग्रेसच्या तब्बल २०० मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे.

नामांतरानंतर लगेच औरंगाबाद काँग्रेसचे शहराध्यक्ष मोहंमद हिशाम उस्मानी यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनीही धडाधड राजीनामे दिले. निर्णय झाल्यांनतर त्याच्यावेळी २२ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. मात्र मोहंमद हिशाम उस्मानी यांचा राजीनामा नाना पटोले स्वीकारतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर झाल्यामुळे हिशाम उस्मानी यांनी राजीनामा दिल्यानंतर आतापर्यंत काँग्रेसच्या २०० मुस्लिम पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आहेत. शहराध्यक्ष, अल्पसंख्याक अध्यक्ष, माजी शहराध्यक्ष यांच्यासह २०० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आधीच भाजपाच्या प्रभावाखाली असलेल्या औरंगाबादमध्ये काँग्रेस अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी वरिष्ठ नेतृत्वाला आता मोठी मोहीम हाती घ्यावी लागणार.

हे ही वाचा:

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी विवेक फणसळकर

‘उद्यापासून मी शिवसेना भवनात बसणार’

‘आता हे सरकार २५ वर्षे चालेल’

कुलगाममध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

नामांतराच्या निर्णयानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणजे, सत्ता जात असताना यांना संभाजीराजेंची आठवण आली आहे. त्यामुळे नाव बदलता येऊ शकतात पण इतिहास बदलता येत नाही. सोबतच या निर्णयाच्या विरोधात गरज पडल्यास आम्ही रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा जलील यांनी दिला.

Exit mobile version