23 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरराजकारणअंबरनाथमध्ये २०० कोरोना मृत्यू लपवले?

अंबरनाथमध्ये २०० कोरोना मृत्यू लपवले?

Google News Follow

Related

अंबरनाथ शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झालेले प्रत्यक्ष मृत्यू आणि आयसीएमआरच्या पोर्टलवर नोंद असलेला शहरातील मृत्यूंचा आकडा यात मोठी तफावत आढळली आहे. शहरातील खासगी रुग्णालयांनी आयसीएमआरच्या पोर्टलवर मृत्यूंची नोंदच केलेली नसल्याची धक्कादायक बाब पालिकेच्या सर्वेक्षणात समोर आली आहे. या सगळ्या प्रकरणाबाबत अंबरनाथ पालिकेनं आज पत्रकार परिषद घेत खुलासा केला. यानंतर अंबरनाथ शहरात मोठी खळबळ उडाली. या वाढीव मृत्यूंच्या आकड्यामुळे अंबरनाथ शहरातील मृतांची संख्या वाढणार असून यापुढे तरी सर्व हॉस्पिटल्सनी याबाबत खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक घातक ठरली. कारण या दुसऱ्या लाटेत अंबरनाथ शहरात तब्बल २०६ रुग्णांचा मृत्यू झाला. अंबरनाथ शहरातील स्मशानात २०६ कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची नोंद आहे. पण आयसीएमआरच्या पोर्टलवर मात्र शहरात फक्त ६५ मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यामुळे इतकी मोठी तफावत कशी निर्माण झाली? याचा शोध घेण्यासाठी अंबरनाथ पालिका प्रशासनाने शहरातील सर्व खासगी कोव्हिड हॉस्पिटल्सकडून मृतांची यादी मागवली. यावेळी १४१ मृतांची नोंद खासगी हॉस्पिटल्सनी आयसीएमआरच्या पोर्टलवर केलेलीच नसल्याचं उघड झालं.

वास्तविक पाहता आपल्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यावर त्याची आयसीएमआरच्या पोर्टलवर नोंद करण्याची जबाबदारी ही खासगी हॉस्पिटल्सवरच सोपवण्यात आली होती. मात्र तरीही शहरातील जवळपास सर्वच हॉस्पिटल्सनी आकडेवारीत लपवाछपवी केल्याचं समोर आलं. या हॉस्पिटल्सची यादीच अंबरनाथ पालिकेनं जाहीर केली आहे.

हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता या सर्व हॉस्पिटल्सना कोव्हिड हॉस्पिटलचा दर्जा रद्द करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली आहे.

दरम्यान, या सगळ्याबाबत आम्ही हॉस्पिटल्सची बाजूही जाणून घेतली. यावेळी आम्हाला आयसीएमआरच्या पोर्टलवर नोंद करायची आहे, ही बाब उशिरा समजली, तसंच आम्ही पालिकेला मात्र सगळ्या मृत्यूंची माहिती दिली असल्याचं साई सिटी हॉस्पिटलचे डॉ. मनोज सिंग यांनी सांगितलं.

हे ही वाचा:

आंदोलनात सहभागी झाल्यामुळे मयुरेश कोटकर यांच्यावर सूड उगवला जात नाही ना?

मराठा मूक मोर्चापूर्वी छत्रपती संभाजीराजे यांनी साधला संवाद

नागपुरमध्ये आशा वर्कर्सचे आंदोलन सुरु

सोनियांच्या प्रभावामुळे शिवसेना राज्यात फॅसिझम राबवतेय काय?

अनेक रुग्ण हे आरटीपीसीआर टेस्ट न करता फक्त एचआरसिटी करून येतात. काही रुग्ण फक्त अँटिजेन करून येतात, मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं फॉर्मलिटी न पाळता त्यांच्यावर आम्हाला आधी उपचार करावे लागतात. मात्र त्यांच्याकडे आयसीएमआरची नोंदणी आणि नंबर नसल्यानं त्यांच्या मृत्यूची नोंद करताना अडचणी येतात, असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा