भारत सरकारने देशविरोधी प्रचार करणाऱ्या वीस यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली आहे. २० डिसेंबर रोजी प्रथमच आयटी कायद्यात समाविष्ट केलेल्या विशेष अधिकाराचा वापर करून असे पाऊल उचलण्यात आले आहे. वीस यूट्यूब चॅनेलसह दोन वेबसाइट्सवरही बंदी घालण्यात आली आहे. या चॅनेल्स आणि वेबसाईट्सवर देशविरोधी प्रचार आणि पाकिस्तानमधून काम केल्याचा आरोप आहे.
सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संस्था आयएसआयच्या मदतीने हा अपप्रचार केला जात होता. त्यापैकी ‘नया पाकिस्तान’ नावाच्या वाहिनीचेही प्रसारण होत होते. त्याचे दोन लाखांहून अधिक सदस्य होते. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या वाहिन्या काश्मीर, कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचा विरोध आणि अयोध्यासारख्या मुद्द्यांवर चिथावणीखोर बातम्या चालवत असत.
हे ही वाचा:
ब्रिटनमधील शीख खासदाराने हिंदू विरोधी ट्विट हटवले
बारावी परीक्षा १५; तर दहावी ४ मार्चपासून
२०१४ नंतर लिंचिंग; मग १९८४ मध्ये काय आंधळी कोशिंबीर होती का?
शिवभोजन थाळीच्या नावावर दोन घोट ज्युस
मिळालेल्या माहितीनुसार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अपूर्व चंद्रा यांनी यूट्यूब आणि दूरसंचार विभागाला पत्र लिहिले होते की, हा कंटेंट भारताच्या सार्वभौमत्वावर आणि अखंडतेला बाधित करत असल्याने तो तत्काळ ब्लॉक करण्यात यावा.
ही माहिती प्रथम सुरक्षा एजन्सींला मिळाली होती, त्यानंतर मग आय अँड बी मंत्रालयाने चौकशी केली. त्यावेळी हा सगळा प्रकार उघडकीस आला.
भारताने बंदी घातलेल्या पंधरा चॅनेल्सची मालकी नया पाकिस्तान ग्रुप कडे आहे, तर इतर चॅनल द नेकेड ट्रूथ , 48 न्यूज आणि जुनेद हलीम अधिकारी यांच्याकडे आहेत.