‘ठाकरे सरकारमध्ये भ्रष्टाचाराची २०-२० ची मॅच सुरु’

‘ठाकरे सरकारमध्ये भ्रष्टाचाराची २०-२० ची मॅच सुरु’

आज गडचिरोलीमध्ये भारतीय जनता पार्टीने शेतकऱ्यांच्या मुद्यांवर मोर्चा काढला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा सुरु आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या मुद्दयांवर बोलताना, फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला राज्यातील गरिबांची, शेतकऱ्यांची चिंता नाही, ठाकरे सरकारला शेतकऱ्यांची चिंता कमी बेवड्यांची जास्त आहे. ठाकरे सरकारमध्ये भ्रष्टाचाराची २०-२० ची मॅच सुरु, अशी सडकून टीका मविआवर केली आहे.

‘जिथे जाऊ तिथे खाऊ, आपण दोघे भाऊ भाऊ ,असे म्हणत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. फडणवीस म्हणाले, कोरोनाकाळात आदिवासींना, शेतकऱ्यांना, गरिबांना आम्ही मदत करत होतो, मात्र ठाकरे सरकार दारू दुकानांना, बार मालकांना मदत करत होते. त्यांच्या लायसन्सची शुल्क पन्नास टक्के ठाकरे सरकारने कमी केले. बार चालकांना हे सरकार मदत करते पण गडचिरोली, चंद्रपूर, नंदुरबारच्या शेतकऱ्यांचे पन्नास टक्के वीज बील का माफ केलं नाही, असा सवाल फडणवीसांनी केला आहे.

हे सरकार आपला आवाज दाबू शकत नाही, या सरकारमध्ये आवाज दाबण्याची हिंमत नाही, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला. या सरकराने भ्रष्टाचाराची २०- २० मॅच सुरु केली आहे आणि विशेष म्हणजे मॅचमधील दोन्ही टीम यांच्याच आहेत. यावेळी जनतेवर अन्याय झालेला आम्ही सहन करणार नाही, आम्ही जनतेचा आवाज आहोत त्यामुळे आम्ही जनतेवर अन्याय होऊ देणार नाही.

२०२४ ला भाजपाच बहुमताचा सरकार येणार आहे, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईतून बिल्डरांचा थकलेला कर घ्या आणि शेतकऱ्यांना वीज द्या अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. मात्र हे सरकार बिल्डरांवर मेहरबान झालेले आहे, कारण बिल्डरांकडून या सरकारला मालपाणी येत असा घणाघात फडणवीसांनी मविआवर केला आहे.

हे ही वाचा:

केमिकल इंजीनियर अब्बासीने केला गोरखपूर मठाच्या सुरक्षा जवानांवर हल्ला

दोनच दिवसांत मुंबईची मेट्रो तीनवेळा बंद पडली

नवाब मलिक १८ एप्रिलपर्यंत कोठडीतच

पुरोहितांना संरक्षण देण्याची अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची मागणी

तसेच जेव्हा राज्यात भाजपाच सरकार होत तेव्हा प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना बोनस मिळत असे, आता मात्र शेतकऱ्यांना साध्या कोणत्या सुविधाही मिळत नसल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या मुद्यावर प्रत्येक जिल्ह्यात महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.

Exit mobile version