केरळच्या भूमीत डावे विरुद्ध भाजपा हा विषय काही नवीन नाही. या संघर्षाचा गेले अनेक वर्षांचा रक्तरंजित इतिहास आहे. केरळमध्ये संघ-भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्याच्या घटना आजवर अनेकदा समोर येत असतात. अशाच दोन घटनांनी सध्या केरळ हादरला आहे.
यातील एका घटनेत केरळ मधील भाजपा कार्यकर्ता रंजीत श्रीनिवासन याची हत्या करण्यात आली आहे. तर दुसऱ्या घटनेत डाव्या विचारांच्या केरळमधील सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे सचिव के.एस. शान यांची हत्या करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा केरळमधील राजकीय हिंसाचाराच्या घटना चर्चेत आल्या आहेत. अवघ्या १२ तासात केरळमध्ये या २ राजकीय हत्या झाल्या आहेत. या हत्यांवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. तर अलाप्पुझा येथे कलम १४४ अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
केरळमध्ये भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या सचिवांची हत्या
२५० कुत्र्यांच्या पिल्लांना मारून माकडांनी घेतला बदला! असे काय घडले होते?
शिवभोजन योजना बंद होणार? ५ महिने अनुदानच नाही
धावत्या रेल्वेमध्ये पढला जातोय नमाज
रंजीत हे भाजपाच्या ओबीसी मोर्चार्चे कार्यकर्ते असून त्यांच्यावर सचिव पदाची जबाबदारी होती. केरळमधील अलाप्पुझा येथील रंजीत श्रीनिवासन हे रहिवासी होते. अलाप्पुझा यांच्या राहत्या घरी त्यांची हत्या करण्यात आली आहे. अज्ञात इसमांनी त्यांच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यामागे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय या कट्टरतावादी संघटनेवर संशय व्यक्त केला जात आहे.
भाजपाचे केरळ प्रदेश अध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी या संदर्भात ट्विट करताना ‘पीएफआय’ वर निशाणा साधला आहे. पीएफआयच्या आतंकवाद्यांनी रंजीत श्रीनिवासन यांची हत्या केल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. तर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनीदेखील या विषयात ट्विट केले आहे. त्यांनी रंजीत यांना श्रद्धांजली वाहताना डाव्या पक्षांवर टीकास्त्र डागले आहे. ‘जिथे डावे आहेत, तिथे मानवता उरत नाही’ असे ट्विट संबित पात्रा यांनी केले आहे.
तर सोशल डेमोक्रॅटिक पक्षाचा कार्यकर्ता के.एस. शान याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर तो गंभगीर झखमी झाला होता. कोची येथील रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरु होते. पण त्याला यश आले नाही. दरम्यान पोलीस या दोन्ही हत्यांचा तपास करत आहेत.