30 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरराजकारणलसीकरणासाठी दोन किलोमीटरपर्यंत रांगा

लसीकरणासाठी दोन किलोमीटरपर्यंत रांगा

Google News Follow

Related

गोरेगावच्या नेस्को आणि वांद्रे येथील बीकेसी कोविड केंद्रावर आज सकाळीच नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी केली आहे. गोरेगावच्या केंद्रावर तर दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. रणरणत्या उन्हात लोक उभे आहेत. त्यात ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचाही समावेश आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसत आहे.

मुंबईच्या गोरेगावमधील नेस्को कोरोना केंद्र आणि बीकेसी केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. लसींचा तुटवडा असल्याने आपल्यालाच लस मिळावी म्हणून नागरिकांनी पहाटे ७ वाजल्यापासून केंद्रावर गर्दी केल्याने दोन किलोमीटरपर्यंत ही रांग गेली आहे. त्यांची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दखल घेतली आहे. नागरिकांनी केंद्रावर गर्दी करू नये. कोविन ऍप्पवर नोंदणी करणाऱ्यांनाच लस मिळणार आहे. तसेच ज्यांचा पहिला डोस झालेला आहे, त्यांनाच प्राधान्याने डोस दिला जाणार असल्याचं पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

लस देणं जेवढं आम्हाला बंधनकारक आहे. तेवढंच नागरिक म्हणून स्वयंशिस्त पाळणंही बंधनकारक आहे, असं सांगतानाच मी स्वत: नेस्को केंद्रावर जाऊन माहिती घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच येणार्या व्हॅक्सीनचा पहिला डोस हा दुसऱ्या डोसवाल्यांनाच देण्यात येणार आहे. त्यांचे डोस पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे. दुसऱ्या डोसवाल्यांना डोस दिल्यानंतर पहिल्या डोसवाल्यांना डोस दिला जाईल, असंही त्या म्हणाल्या.

हे ही वाचा:

सुनील मानेकडे प्रियदर्शनी पार्क ते अँटेलियाचे नकाशे

पंकजा मुंडेंना कोरोनाची लागण

दीपाली चव्हाण आत्महत्त्या प्रकरणात श्रीनिवास रेड्डीला अटक

कोविन ऍप्पवर नोंदणी केल्याशिवाय लस मिळणार नाही हे नागरिकांना आम्ही सोशल मीडिया, पालिकेच्या माध्यमातून कळवले आहे. पण लोक सरसकट रस्त्यावर आले आहेत. मुंबईत रणरणतं उन आहे. या उन्हाचा त्यांना तडाखा बसू शकतो. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये. नोंदणीशिवाय कोणत्याही सेंटरवर जाऊ नका, असंही त्या म्हणाल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा