येत्या दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नेत्यांचे विषय समोर येतील

येत्या दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नेत्यांचे विषय समोर येतील

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच नव्हे तर आता काँग्रेस नेत्यांचे घोटाळेही भाजपा काढणार आहे. तसे सुतोवाचच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. येत्या दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नेत्यांचे विषय समोर येतील, असं मोठं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

“कायद्याची लढाई कायद्यानं लढा, कायद्याची लढाई कोल्हापुरी चपलेनं लढू नका. कोल्हापुरी चप्पल दाखवणं सोप्पं आहे, पण ईडीला फेस करणं कठीण आहे. तोंडाला फेस येईल. यावर बोलात की, कारखान्यात ९८ कोटी ज्या कंपन्यांमधून आलेत, त्या कंपन्या कुठे आहेत? त्या कंपन्यांनी सेनापती घोरपडेंच्या कारखान्यामध्ये कशी गुंतवणूक केली, यावर बोला ना, यावर बोलतच नाही. यावेळी मला मुश्रीफांना एक आवाहन करायचं आहे की, पॅनिक होऊन काही होत नसतं, शांत डोक्यानं काम करायचं असतं.” असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

पाटील यांनी काँग्रेसच्या दोन नेत्यांचे घोटाळे बाहेर येणार असल्याचं सूचक विधान केलं आहे. पण ते कोण नेते आहेत ते काही त्यांनी सांगितलं नाही. त्यामुळे अधिकच सस्पेन्स वाढला आहे. ज्या काँग्रेस नेत्यांचे घोटाळे बाहेर येणार आहेत ते राज्यमंत्री आहेत की कॅबिनेट मंत्री? ते आमदार आहेत की नेते आहेत? यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

हे ही वाचा:

५ ते ११ वयोगटासाठी फायझरची नवी लस लवकरच उपलब्ध होणार

अमेरिकेने जीव वाचवून पळ काढला

काँग्रेस शासित राजस्थानमध्ये हिंदू मुलाचे ‘लिंचिंग’

तक्रारदार स्थानबद्ध तर गावगुंड राज्यभर मुक्त

“पश्चिम महाराष्ट्रातून, कोल्हापुरातून आम्ही भुईसपाट झालो, असा आरोप तुम्ही करताय. पश्चिम महाराष्ट्रात फक्त कोल्हापूर येत नाही. सोलापुरात भाजपचे फक्त दोन आमदार होते. ते आता ८ झालेत, मुश्रीफ साहेब. सांगली महापालिकेत महापौरपद दगाफटक्याने गेलं पण स्थायी समिती पुन्हा भाजपाकडे आली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हापरिषद आमच्याकडे होती. पण हे तीन पक्ष ५६ ला मुख्यमंत्री ५४ ला उपमुख्यमंत्री आणि ४४ ला महसूलमंत्री यातून कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद गेली.”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Exit mobile version