शिंदे- फडणवीस सरकारचा आज, ९ ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यामुळे शिवसेनेतून नऊ आणि भाजपातून नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज शपथविधी सोहळा पार पडला. तर या १८ जणांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
भाजपाच्या राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगुंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा यांनी आज कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. तर शिवसेनेकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली.
हे ही वाचा:
डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरावर ‘एफबीआय’चा छापा
‘जमाते इस्लामी’ संघटनेसंबंधित जम्मू काशमीरमध्ये NIA कडून छापेमारी
नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी ठरला
आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या सर्व मंत्र्यांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यावेळी उपस्थित होते.