‘होला मोहल्ला’ दंगलप्रकरणात १७ जणांना अटक

‘होला मोहल्ला’ दंगलप्रकरणात १७ जणांना अटक

महाराष्ट्रात होळी उत्साहात साजरी होत असताना, नांदेडमध्ये होला मोहल्ला सण साजरा करताना काही शीख तरुणांनी पोलिसांवरच हल्ला केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. या हल्ल्यात काही पोलिस जखमी झाले आहेत. जमावाकडून पोलिसांवर झालेल्या या हल्ल्यामुळे नांदेडमधील वातावरण सध्या तणावाचे झाले आहे. याप्रकरणात पोलिसांनी १७ लोकांना अटक केलेली आहे.

हे ही वाचा:

कट्टरपंथी सोकावले असताना ‘आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही’चा टेंभा मिरवायला शिवसेना तयारच असते

गृहमंत्र्यांनी टार्गेट बाजूला ठेवून इथेही जरा लक्ष द्यावे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया होण्याची शक्यता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड मधील शीख समाजाला ‘होला मोहल्ला’ हा त्यांचा धार्मिक उत्सव सार्वजनिकपणे साजरा करायला पोलीस प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली होती. गुरुद्वारा समितीला यासंबंधी कळविण्यात आले होते आणि त्यांनी हा उत्सव गुरुद्वाराच्या आताच साजरा करण्याचे मान्य केले होते. पण सोमवारी अचानक ४ वाजताच्या सुमारास शीख जमावाकडून निशान साहिब गुरुद्वाराच्या दरवाज्यावर आणण्यात आला. अंदाजे ३०० ते ४०० तरुणांचा जमाव होता. हा जमाव पोलिसांसोबत हुज्जत घालू लागला. एका क्षणी हे सगळेच नियंत्रणाबाहेर झाले आणि त्यांनी बंद असलेले गेट तोडले. ते पोलिसांवर धावून गेले. त्यांनी पोलिसांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात चार पोलीस अधिकारी जखमी झाले तर अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.

याप्रकरणात पोलिसांनी १७ लोकांना अटक केली आहे आणि दंगल करणे तसेच हत्येचा प्रयत्न करणे या गुन्ह्याखाली अनेक अज्ञात लोकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याबरोबरच नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी घडलेला प्रकार दुर्दैवी असल्याचे म्हटले होते.

Exit mobile version