अखंड भारत संकल्पदिनाला मोदींनी केले ‘हे’ ट्विट

अखंड भारत संकल्पदिनाला मोदींनी केले ‘हे’ ट्विट

भारताची फाळणी ही एक अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक घटना होती असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. भारताच्या फाळणीवेळी अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. म्हणून आजचा दिवस  #PartitionHorrorsRemembranceDay म्हणून घोषित करण्यात आला आहे.

१४ ऑगस्ट १९४७ हा दिवस भारतीय इतिहासातील एक काळा दिवस ठरला. कारण त्याच दिवशी या परमपवित्र अश्या भारत भूमीचे धर्माच्या आधारे विभाजन करण्यात आले. काही मोजक्या कट्टरतावादी लोकांच्या स्वार्थी मागणी समोर या देशातील अनेक दिग्गद नेत्यांनी नमते घेतले. या वेळी लाखो देशवासियांच्या भावना पायदळी तुडवल्या गेल्या. पाकिस्तान नावाचा एक नवा देश तयार करण्यात आला. ही भळभळणारी जखम या देशाच्या माथी मारली गेली. जी जखम आज ७५ वर्षांनंतरही ताजी आहे.

दरवर्षी १४ ऑगस्ट या दिवशी पाकिस्तानमध्ये त्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात असतानाच भारतभर मात्र अखंड भारत संकल्प दिवस साजरा केला जातो. या दिवशी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. लाखो नागरिक या कार्यक्रमांत सहभाग नोंदवतात. ज्यामध्ये भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन हा त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग. हे पूजन म्हणजे भारताच्या आजच्या भौगोलिक नकाशपर्यंत मर्यादित नसून अखंड भारताचा जो सांस्कृतिक नकाशा आहे त्याचे पूजन केले जाते.

हे ही वाचा:

महाग पेट्रोलवर हा नवा पर्याय येणार

अखंड भारत संकल्प दिन म्हणजे नेमके काय रे भाऊ?

पर्यावरण संरक्षणासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

तालिबान अफगाणिस्तानवर कब्जा करण्याच्या उंबरठ्यावर

अशाप्रकारे अखंड भारत संकल्पदिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी ट्विट केल्यामुळे अनेक भारतीयांना आनंद झाला आहे. या ट्विटमधून मोदी पाकिस्तानला काही संदेश देत आहेत का? असे प्रश्न राजकीय वर्तुळात फिरत आहेत.

Exit mobile version