मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीला १२ खासदार उपस्थित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीला १२ खासदार उपस्थित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक सुरु आहे. विशेष म्हणजे, या बैठकीला शिवसेनेचे १२ खासदार हे थेट दिल्लीतून ऑनलाईन सहभागी झाले आहेत. राष्ट्रपती निवडणुकीनंतर १२ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याची माहिती आली आहे.

अरविंद सावंत, विनायक राऊत, गजानन किर्तीकर आणि ओमराजे निंबाळकर वगळता इतर १२ खासदार या बैठकीला ऑनलाईन उपस्थित असल्याची माहिती पुढे येते आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेतील याकडे सगळयांचं लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीला, भावना गवळी, राहुल शेवाळे, हेमंत गोडसे, धैर्यशील माने, संजय मंडलिक, राजेंद्र गावित, श्रीरंग बारणे, संजय जाधव, सदाशिव लोखंडे, प्रताप जाधव, कृपाल तुमाणे आणी हेमंत पाटील हे बारा खासदार एकनाथ शिंदे यांच्या बैठकीला उपस्थित होते.

हे ही वाचा:

ठाकरेंना आणखी एक धक्का; भावना गवळी शिंदेंबरोबरच्या खासदारांच्या प्रतोद?

“सभागृह म्हणजे लोकशाहीचं तीर्थक्षेत्र”

भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी सुल्ताना खान यांच्यावर हल्ला

अमेरिकेतील इंडियाना स्टेट मॉलमधल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडण्याची मालिका सुरूच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आधी आमदार गेले. त्यानंतर नगरसेवक, माजी नगरसेवक पाठोपाठ त्यांच्या सोबत जात आहेत. आता ऑनलाईन बैठकीला खासदारांनी उपस्थिती लावल्यामुळे उद्धव ठाकरेंना अजून एक धक्का सहन करावा लागेल असं म्हटलं जात आहे. आजच माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

Exit mobile version