उदय सामंत हल्ल्यातील आरोपी आता न्यायालयीन कोठडीत

उदय सामंत हल्ल्यातील आरोपी आता न्यायालयीन कोठडीत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर काही दिवसांपूर्वी पुण्यात हल्ला झाला होता. पोलिसांनी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह सहा जणांना अटक केली होती. या सहा जणांना आज, ६ ऑगस्ट रोजी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची कात्रजमध्ये मंगळवारी सभा झाली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सभेसाठी गोळा झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याच्या मागे उदय सामंत यांची गाडी होती. सिग्नल लागल्यामुळे त्यांची गाडी सिग्नलवर थांबली असता, अचानकपणे त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. हा हल्ला पूर्वनियोजित आणि सुपारी देऊन करण्यात आल्याचा गंभीर आरोप उदय सामंत यांनी केला होता. हल्ल्या प्रकरणात कोथरुड पोलीस ठाण्यात सामंत यांनी तक्रार दिली आहे. हल्ल्यांनंतर तात्काळ पोलिसांकडून आरोपींचा शोध घेऊन अटक करण्यात आली होती.

याप्रकरणी पोलिसांकडून शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह सहा जणांना अटक केली होती. आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. या सहा आरोपींना ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज त्यांची कोठडी संपल्याने आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हे ही वाचा:

तर हिंदूंना तिसरा डोळा उघडावा लागेल

वझीरएक्स क्रिप्टो एक्सचेंजची ६४ कोटींची बँक मालमत्ता ईडीने गोठवली

भुजबळ, आव्हाड यांना अजूनही बंगले सोडवेनात

शेतकऱ्यांना नवी दृष्टी देणारे ‘भागीरथ’ प्रयत्न

दरम्यान, मंगळवारी पुण्यातील कात्रज परिसरात हा हल्ला झाला होता. या हल्ल्यात उदय सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटली होती. आमदार तानाजी सावंत यांच्या घरी जात असताना कात्रज चौकात हा हल्ला झाला.

Exit mobile version