केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतेच मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ वर्षे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मात्र, हा निर्णय मुरादाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. एस. टी. हसन आणि संभल लोकसभा मतदारसंघाचे खासदार शफीकुर रहमान बर्क यांनी वयाच्या २१व्या वर्षी मुलीचे लग्न करणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले.
यावर खासदार डॉ. हसन म्हणाले की, मुलगी हुशार असेल तर वयाच्या १६व्या वर्षीही मुलीचे लग्न लाऊन दिल्यास काहीही नुकसान होत नाही. जर मुलगी १८व्या वर्षी मतदान करू शकते, तर ती लग्न का करू शकत नाही. मुलींच्या लग्नाचे कायदेशीर वय १८ वरून २१ वर्षे करण्याचा प्रस्ताव मान्य नसल्याचेही ते म्हणाले.
खासदार शफीकुर रहमान बर्क यांनीही लग्नाचे वय १८ वरून २१ वर्षे करण्यास विरोध केला आहे. मुलींचे लवकर लग्न केले तर त्या अनेक वाईट परिस्थितीपासून वाचू शकतात. मुलींच्या वयाच्या १४व्या वर्षी त्यांचे लग्न व्हावे असे वादग्रस्त विधानही त्यांनी केले आहे.
हे ही वाचा:
‘अमरावतीची घटना पुन्हा घडली तर त्यांना सोडायचे नाही’
मुंबईत काळाबाजारीचे दहा कोटींचे गहू, तांदूळ जप्त
विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर ठाकरे सरकारचा घाला
चक्क सापाला हातात धरून मारल्या दोरीउड्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाने बालविवाह प्रतिबंध सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली. सध्या, कायद्यानुसार मुलींसाठी विवाहाचे किमान वय हे १८ वर्षे आहे, तर मुलांसाठी विवाहाचे किमान वय २१ वर्षे आहे. मुलींचे लग्नाचे किमान वय २१ केल्यानंतर मुलगा आणि मुलीचे लग्नाचे किमान वय समान होईल.