25 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरक्राईमनामाएकनाथ खडसे आणि कुटुंबियांना १३७ कोटींच्या दंडाची नोटीस

एकनाथ खडसे आणि कुटुंबियांना १३७ कोटींच्या दंडाची नोटीस

अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी महसूल विभागाची कारवाई

Google News Follow

Related

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांना १३७ कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. महसूल विभागाने ही नोटीस बजावली आहे. अवैध गौण खनिज उत्खनन केल्या प्रकरणी खडसे कुटुंबीयांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मुक्ताईनगरचे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी तक्रार केली होती. चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत या अवैध गौण खनिज उत्खननाचा मुद्दा उपस्थित केला होता. सातोर शिवारात १ लाख १८ हजार ब्रास अवैध गौण खनिज उत्खनन झाल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी एसआयटीची स्थापना केली होती. एसआयटीने या प्रकरणाची चौकशी करून शासनाकडे अहवाल सादर केला आहे.

त्यानंतर एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, रोहिणी खडसे आणि रक्षा खडसे यांना १३७ कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारी आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई होणार असल्याचे संकेत दिले होते. बेकायदेशीरपणे गौण खनिज उत्खनन घोटाळ्यात एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई होणार आहे. एसआयटीची चौकशी पूर्ण झाली आहे. कारवाईला सुरुवात होणार आहे, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता.

हे ही वाचा:

ललित पाटीलच्या दोन महिला साथीदारांना अटक

हॉस्पिटलमधील कर्मचारी, पोलिसांना मॅनेज करण्यासाठी ललित पाटील देत होता पैसे

थरूर केरळात रिमझिमले पण, महाराष्ट्रात ठाकरे का सुखावले?

पाकिस्तानकडून जम्मू सीमेवरील विक्रम चौकीवर गोळीबार; दोन जवान जखमी

कोट्यवधी रुपयांचे बेकायदेशीरपणे गौण खनिज उत्खनन केल्याचे पुरावे सुद्धा आहेत. माझा आरोप खरा असल्यामुळे चौकशीसाठी एसआयटी नियुक्त करण्यात आली होती. आता एसआयटीची चौकशी पूर्ण झाली असून कारवाईला सुरुवात झाली आहे. लवकरच कारवाईबाबतचे पत्र आपल्या हातात पडेल, अशी माहिती पाटील यांनी दिली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा