सौदी अरेबिया सरकारने मक्का आणि अल कासीम मशिदितील १०० इमाम आणि मौलवींना ‘अलविदा’ केले आहे. मुस्लिम ब्रदरहुड या दहशतवादी संघटनेचा निषेध न करणे त्यांना चांगलेच महागात पडले आहे.
सौदी सरकारच्या इस्लामीक व्यवहार मंत्रालयाने देशातील सर्व धर्मगुरूंना सूचना दिल्या होत्या. मुस्लिम ब्रदरहूड या दहशहतवादी संघटनेचा निषेध करण्याचा आदेश यातुन दिला गेला होता. हे संघटना समाजात फूट पडून तेढ निर्माण करत आहे असा संदेश इमामांनी देणे अपेक्षित होते. शुक्रवारच्या नमाजापूर्वी ईमामांद्वारे सर्व नमाजींचे प्रबोधन केले जाते. या उद्बोधनात मुस्लिम ब्रदरहूडचा कडाडून निषेध करायचा होता. पण मक्का आणि अल कासीम मशिदीतील धर्मगुरूंनी या सरकारी सूचनेला केराची टोपली दाखवली. त्यामुळे आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.
मुस्लिम ब्रदरहूड संघटनेची स्थापना १९२८ ला इजिप्तमधे झाली. इस्लामचे पुनरुज्जीवन हे या संघटनेचे मूळ ध्येय आहे. १९५० च्या दशकात सौदीने अनेक ब्रदरहूड कार्यकर्त्यांना आश्रय दिला होता. पण १९९० मध्ये इराक ने कुवेत वर केलेला हल्ला आणि २००३ मधे अमेरिकेने इराक वर केलेल्या हल्ल्यानंतर हे संबंध बिघडायला सुरुवात झाली.सौदी सरकारने २०१४ सालीच मुस्लिम ब्रदरहूडला दहशदवादी संघटना म्हणून घोषित करून बंदी घातली आहे.
(मिडल ईस्ट मॉनिटरच्या रिपोर्ट नुसार)