संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला तो कृषि कायदे रद्द करण्याचे विधेयक मंजूर करण्यात आल्यानंतर संसदेत गदारोळ झाला. त्यावरून राज्यसभेत विरोधी पक्षाच्या १२ खासदारांना या हिवाळी सत्रासाठी निलंबित करण्यात आले आहे.
या १२ खासदारांमध्ये शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी, अनिल देसाई, एल्माराम करीम (सीपीएम), फुलो देवी नेताम, छाया वर्मा, आर. बोरा, राजामणी पटेल, सय्यद नासिर हुसेन, अखिलेश प्रसाद सिंग (सर्व काँग्रेस), बिनॉय विश्वम (सीपीआय), डोला सेन, शांता छेत्री यांचा समावेश आहे.
कृषि कायदे रद्द करण्यासंदर्भातील विधेयक मागे घेण्यात आल्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि कामकाज होऊ दिले नाही. त्यानंतर कामकाज तहकूब करण्यात आले. विरोधी पक्षाच्या खासदारांनी चर्चा व्हायला हवी अशी मागणी केली मात्र ती करताना खासदार शांत मात्र बसलेले नव्हते.
राज्यसभेत काँग्रेसचे खासदार आणि डोला सेन या तृणमूल काँग्रेसच्या खासदार वेलमध्ये उतरल्या आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. कृषि मंत्री नरेंद्र तोमर यांनी कृषि कायदे रद्द करण्यासंदर्भातील विधेयक मांडल्यानंतर हा गोंधळ सुरू झाला.
हे ही वाचा:
कृषी कायदे मागे घेण्यावर संसदेचा शिक्का! राज्यसभेतही बिल पारित
कृषि कायदे रद्द करणारे विधेयक सादर; विरोधकांचा प्रचंड गोंधळ
वकील महिलेचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न
औषध खरेदीचा प्रस्ताव प्रलंबित ठेवून मुंबईकरांच्या आरोग्याची हेळसांड
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मग या १२ गोंधळी खासदारांचे निलंबन केले. हे निलंबन संसदेच्या हिवाळी अधिवेशनापुरते आहे. त्यानंतर मात्र कामकाज तहकूब करण्यात आले