काँग्रेसची ११ वी यादी; आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या भगिनीला तिकीट

आंध्र प्रदेश, बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील उमेदवारांच्या नावांचा समावेश

काँग्रेसची ११ वी यादी; आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या भगिनीला तिकीट

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आंध्रप्रदेश, बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील १७ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने त्यांची ११ वी यादी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुका आता अगदीच काही दिवसांवर असून सर्वच पक्षांकडून उमेदवरांची नावं जाहीर केली जात आहे. काँग्रेसने आतापर्यंत २४० उमेदवारांची घोषणा केली आहे. याबरोबरच राहिलेल्या उमेदवारांच्या नावाची घोषणादेखील लवकरच होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसने मंगळवारी जाहीर केलेल्या यादीत आंध्र प्रदेश, बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. काँग्रेसने आंध्र प्रदेशमधील कडप्पा लोकसभा मतदारसंघातून वाय एस शर्मिला यांना उमेदवारी दिली आहे. तर, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी अविनाश रेड्डी यांना तिसऱ्यांदा कडप्पा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी आणि वाय एस शर्मिला यांचे अविनाश रेड्डी हे चुलत भाऊ आहेत. आता काँग्रेसकडून वाय एस शर्मिला यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे कडप्पा मतदारसंघात बहिण भावामध्ये लढत होणार आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या बहिण वाय एस शर्मिला यांनी जानेवारी महिन्यात काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत वाय एस शर्मिला यांनी स्वत:च्या पक्षाचे उमेदवार उभे न करता काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यानंतर त्यांनी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता काँग्रेसकडून त्यांना लोकसभेची तिकीट देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

बापरे! ससूनमध्ये तरुणाचा उंदीर चावल्याने मृत्यू!

ख्रिश्चन धर्म स्वीकाराण्यासाठी आर्थिक आमिष

केजरीवाल ‘आत’ गेल्यावर आता संजयसिंग ‘बाहेर’

कुराण जाळणाऱ्या इराकच्या सलवान मोमिकचा मृत्यू?

माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू यांना काकीनाडामधून उमेदवारी दिली आहे. खासदार मोहम्मद जावेद यांना बिहारमधील किशनगंज या मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. कटिहारमधून माजी केंद्रीय मंत्री तारिक अन्वर तर भागलपूरमधून अजित शर्मा यांनाही तिकीट मिळाले आहे. पश्चिम बंगालमधील सामाजिक कार्यकर्ते डॉ. मुनीश तमांग यांना दार्जिलिंगमधून उमेदवारी दिली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Exit mobile version