११,६१७ कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंदच नाही

११,६१७ कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंदच नाही

महाराष्ट्रातील कोरोनाची आकडेवारी ही देशातील इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे हे स्पष्ट होतेच आहे. पण मे ते जून या कालावधीत अवघ्या २३ दिवसांत मृतांची संख्या ही २० हजारापर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रात कोरोनाने प्रवेश केल्यापासून गेल्या १५ महिन्यांपैकी एकाच महिन्यात सर्वाधिक मृतांची संख्या पाहायला मिळाली. राज्याच्या पोर्टलवर  ११,६१७ कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आलेली नाही असे धक्कादायक वृत्त आले आहे. याच विषयावर भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे.

“राज्याच्या पोर्टलवर ११,६१७ कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आलेली नाही असे धक्कादायक वृत्त आले आहे. वसूली सरकारने कितीही लपवाछपवी केली तरी सत्य लपणार नाही.आपल्या क्षुल्लक स्वार्थासाठी जनतेच्या जीवावर उठू नका.” असं ट्विट अतुल भातखालकरांनी केलं आहे.

हे ही वाचा:

मालवणीतील दुर्घटनेमुळे अनधिकृत बांधकामांचा मुद्दा ऎरणीवर

कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा लाखापेक्षा कमी

आमचा लढा डॉक्टरांच्या विरोधात नसून औषधं माफियांच्या विरोधात

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार आयपीएलचे उर्वरित सामने

राज्यात काल कोरोना रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत काहीशी वाढ पाहायला मिळाली आहे. तसेच काल कालपेक्षा अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात काल १० हजार ९८९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल १६ हजार ३७९ कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल राज्यात १०२१९ रुग्णांची नोंद झाली होती.

मृतांच्या संख्येची माहिती देणाऱ्या पोर्टलवर अतिरिक्त ११ हजार ६१७ मृत्यूंची नोंद झालेली नसून, ती येत्या दोन दिवसांत करण्याचा आदेश आरोग्य विभागाने दिला आहे. नोंदी न झाल्यास संबंधित जिल्हा शल्य चिकित्सकांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. नोंदी पूर्ण झाल्यानंतर राज्यातील मृतांच्या संख्येत किमान दहा टक्के वाढ होणार असून, आत्तापर्यंत या बाबत एवढा निष्काळजीपणा का दाखवला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Exit mobile version