संजय राऊतांच्या घरातून ११.५० लाखांची रोकड जप्त

संजय राऊतांच्या घरातून ११.५० लाखांची रोकड जप्त

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरावर सकाळपासून ईडीचे धाडसत्र सुरू आहे.रविवार, ३१ जुलैला ईडीचे पथक संजय राऊत यांच्या भांडुपच्या घरी दाखल झाले होते. नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले. दिवसभराच्या चौकशीनंतर संध्याकाळी इडीने राऊत यांना ताब्यात घेऊन फोर्ट येथील कार्यालयात घेऊन गेली.

ईडीची चोैकशी ही प्रामुख्याने गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्यातीळ मनीलौड्रिंगशी आहे.परंतु बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो या घोटाळ्याशी माझा कोणताही संबंध नाही असे राऊत यांनी म्हटलं आहे. परंतु याच दरम्यान राऊत यांच्या निवासस्थानी ईडीला ११ लाख ५० हजार रुपयांची रोकड मिळाली असून ती ईडीने जप्त केली आहे.

ईडीने ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे बंधू सुनील राऊत यांनी गोरेगाव पत्राचाळ संबंधित कोणतेही कागद ईडीच्या हाती लागले नाहीत असे सांगितले. मात्र अनेक कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. पण राऊत यांच्या निवासस्थानी  ११ लाख ५० हजार रुपयांची रोकड सापडल्याने पुन्हा एकदा भुवया उंचावल्या आहेत

ईडीने राऊत यांच्या घरी जप्त केलेली रोकड त्यांच्याकडे कशी आली की त्यांनी घरगुती कामासाठी ठेवली होती याबाबत कोणताच खुलासा झालेला नाही. सध्या राऊत हे ईडीच्या ताब्यात असून रात्री उशीरा त्यांची चौकशी होणार आहे. या चौकशी दरम्यान या रोख रक्कमेचा खुलासा होईल असे म्हटलं जात आहे. पण सध्या तरी या रोकड मागचे सत्य गुलदस्त्यात आहेत. सेना संपवण्यासाठी माझ्यावर ही कारवाई सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

या आधीही भूखंड, प्लॅट जप्तीची कारवाई

ईडीने केलेली ही नवीन कारवाई नाही. या अगोदर सक्तवसुली संचलनालयाने पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी आतापर्यंत केलेल्या कारवाईमध्ये अलिबाग येथील जमीन आणि मुंबईतील घर जप्त केलं आहे. ही कारवाई काही दिवसांआधी करण्यात आली होती. एकूण ११ कोटी १५ लाख ५६ हजार ५७३ रुपयांच्या स्थावर मालमत्ता आतापर्यंत ईडीने जप्त केली आहे. संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे. मात्र आज सकाळी सात वाजतापासून सुरु करण्यात आलेल्या कारवाईमध्ये जप्तीबद्दल ठोस माहिती पुढे येणे बाकी आहे.

Exit mobile version