ठाकरे गटाला नाशिकमधून मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटातील ११ माजी नगरसेवकांसह मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला आहे.
दोन दिवसांपूर्वीचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर होते. त्यांची पाठ फिरताच नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. ठाकरे गटातील माजी नगरसेवकांनी रात्री मुंबईला येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
ठाकरे गटातील माजी नगरसेवक अजय बोरस्ते, रमेश धोंगडे, सूर्यकांत लवटे, सुदाम डेमसे, सुवर्णा मटाले, ज्योती खोले, पुनम मोगरे, जयश्री खर्जुल, चंद्रकांत खाडे, प्रताप मेहरोलिया यांच्यासह मनसेचे पदाधिकारी सचिन भोसले यांचा समावेश आहे.
नाशिकमध्ये ठाकरे गटाला उभारी देण्यासाठी संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर गेले होते. आठ दिवसांमध्ये संजय राऊत यांनी दोन वेळा नाशिकचा दौरा केला होता. यावेळी संजय राऊत यांनी दोन वेळा पत्रकार परिषद घेतली होती. ठाकरे गटात कुठलीही गटबाजी नाही, एकही माजी नगरसेवक किंवा पदाधिकारी पक्ष सोडणार नाही, असा ठाम दावा संजय राऊत यांनी केला होता.
हे ही वाचा :
अखेर कोळी बांधवांची मागणी मुख्यमंत्र्यांनीचं पूर्ण केली
पाकिस्तानी पत्रकाराला एस जयशंकर यांनी फटकारलं
‘गांधी-गोडसे एक युद्ध’ मधून राजकुमार संतोषी काय सांगणार?
हत्या झालेली वीणा कपूर आणि जिवंत वीणा कपूर यामुळे उडाला गोंधळ
मात्र, संजय राऊत नाशिकमधून बाहेर पडले. तोच त्यांच्या पाठीमागे नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा नाशिक दौरा अपयशी ठरला असल्याची चर्चा आहे.