नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा

नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा

भाजपा आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला असला नितेश राणे यांना तात्पुरता दिलासा दिला आहे. संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी अटकेपासून १० दिवसांचे संरक्षण नितेश राणे यांना देण्यात आले आहे. तसेच नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयापुढे शरण जाण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. जिल्हा सत्र न्यायालयात नियमित जामीनासाठी अर्ज करण्याची मुभा देखील त्यांना देण्यात आली आहे.

नितेश राणे यांचा सत्र न्यायालय, त्यानंतर उच्च न्यायालय आणि आता सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. नितेश राणेंना दहा दिवसात सत्र न्यायालयापुढे शरण या, कनिष्ठ कोर्टात जामिनासाठी अर्ज करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांना जामिनासाठी कोर्टात धाव घ्यावी लागली होती. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या प्रचारावेळी नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप संतोष परब यांनी केला होता.

हे ही वाचा:

नितीन राऊतांनी मानसिक आजारावर डॉ. हेडगेवार रूग्णालयात उपचार घ्यावेत!

कर्जतच्या जमिनीशी उद्धव ठाकरे यांचा संबंध सोमय्या करणार उघड…

‘मंत्रालयात माझा फोटो काढणारा उद्धव ठाकरेंचा निकटवर्ती?’

भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार चरणजीत सिंह यांचे निधन

राजकीय कारणामुळे नितेश राणेंना या गुन्ह्यात अडकवण्यात आले आहे, असा युक्तिवाद नितेश राणे यांच्या वकिलाने केला होता. दोन्ही बाजूचे म्हणणे मांडल्यावर न्यायालयाने एक ऑर्डर पास केली. त्यानुसार नितेश राणेंना कनिष्ठ न्यायालयात अर्ज करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी त्यांना १० दिवसांची वेळ देण्यात आली आहे. नितेश राणे लगेचचं न्यायालयात अर्ज दाखल करतील, असे वकील संग्राम देसाई म्हणाले.

Exit mobile version