काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडि आघाडी आणि त्यांचे नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अखिलेश यादव, शरद पवार आणि तेजस्वी यादव यांनी ‘लोकतंत्र बचाव रॅली’चे आयोजन दिल्लीतील रामलीला मैदानात केले होते. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ ही रॅली काढण्यात आली होती. मात्र तिथे जमलेल्या एका तरुणाने आपण ३०० रुपये मिळणार असल्याचे सांगितल्याने आपण येथे आलो होतो, असे सांगून या गर्दीचे रहस्य उघड केले.
‘माझे नाव राज वर्मा आहे. मी सोनिया विहारमध्ये राहतो. या कार्यक्रमाच्या आयोजकंनी मला येथे थोडा वेळ येण्यास सांगितले होते. ही रॅली कोणाविरोधात नव्हती. तर अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनासाठी होती. आम्हाला त्यासाठी ३०० रुपये मिळणार होते. आम्हाला केवळ गर्दीत दिसायचे होते,’ असे या तरुणाने सांगितले.
नरेंद्र मोदी यांना मॅच फिक्सिंग करून लोकसभेची निवडणूक जिंकायची असून नंतर देशाची राज्यघटनाच बदलायची आहे, असा घणाघाती हल्ला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रववारी चालवला. ही सामान्य निवडणूक नसून देशाची लोकशाही आणि राज्यघटना यांच्या रक्षणाची निवडणूक आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
हे ही वाचा:
हिंदू रिक्षा चालकावर जमावाचा हल्ला
अरविंद केजरीवालांना १४ दिवसांची न्यायालयीने कोठडी
‘मॉस्को हल्ल्याशी संबंध असल्याचा रशियाचा आरोप धादांत खोटा’
मविआमध्ये एकोपा नाही; प्रकाश आंबेडकरांचा घाणाघात
‘दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व झारखंडचे हेमंत सोरेने यांना मोदी यांनी तुरुंगात टाकल्याने आज ते येथे नाहीत, पण आम्ही सारे मनाने एकसाथ आहोत. जेव्हा पंच आणि कर्णधारावर दबाव आणून तसेच खेळाडूंना विकत घेऊन सामना जिंकता येतो, तेव्हा क्रिकेटमध्ये त्याला मॅच फिक्सिंग म्हणतात. आमच्यासमोर आता लोकसभा निवडणूक आहे. पंचाची निवड कोणी केली? सामना सुरू होण्यापूर्वी दोन खेळाडूंना अटक करण्यात आली. नरेंद्र मोदी या निवडणुकीत मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशातील सर्वांत मोठ्या विरोधी पक्षाची बँक काथी सील करून ही निवडणूक जिंकण्याचा भाजपचा डाव आहे,’ असा आरोप राहुल गांधी यांनी केला.