सिंघू बॉर्डरवर आंदोलकांकडून पोलीस,स्थानिकांवर हल्ला

सिंघू बॉर्डरवर आंदोलकांकडून पोलीस,स्थानिकांवर हल्ला

दिल्लीच्या सीमेवर सिंघू बॉर्डरवर पुन्हा एकदा हिंसा झाली आहे. सिंघू बॉर्डरवर प्रदर्शनकर्ते आणि स्थानिक यांच्यात मोठ्या प्रमाणात हाणामारी झाली आहे. या प्रकरणात हिंसा थांबवण्यासाठी मध्ये पडलेल्या पोलिसांवरही प्रदर्शनकर्त्यांनी हल्ला केला आहे.

 

दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या प्रदर्शनांमुळे पुन्हा एकदा हिंसा झाली आहे. २६ जानेवारी २०२१ रोजी प्रजासत्ताकदिनी आंदोलकांनी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला. दंगेखोरांनी अनेक बसेस फोडल्या. ३०० होऊन अधिक पोलीस या प्रकरणात गंभीर जखमी झाले. काही दंगेखोरांनी लाल किल्ल्यावर खालिस्तानचा झेंडा फडकावला. या सगळ्या प्रकारानंतर देशभरात आंदोलकांविरुद्ध संतापाची लाट उसळली. सिंघू बॉर्डरवर आंदोलकांविरुद्ध स्थानिकसुद्धा रस्त्यावर उतरले.

 

दोन महिन्याहून अधिक काळ सुरु असलेल्या आंदोलनामुळे स्थानिक रहिवाश्यांना अनेक कष्टांना सामोरे जावे लागत होते. स्थानिकांना दैनंदिन कामांसाठी मोठ्या प्रमाणात वळसा घालून जावे लागत होते. हे प्रकार २ महिने स्थानिकांनी सहन केले. परंतु आज स्थानिकांचा धीर सुटला.

स्थानिक साहिवासी आज आंदोलकांविरुद्ध प्रदर्शन करत असताना दोन गटांमध्ये हिंसा भडकली. आंदोलनकर्ते आणि स्थानिक यांच्यात दगडफेक झाली आणि लाठ्या काठ्यांनी एकमेकांवर हल्ले केले गेले. हा प्रकरपाहून पोलीस जेंव्हा मध्ये पडले तेंव्हा आंदोलनकर्त्यांनी पोलिसांनाही मारहाण केली. या प्रकरणात आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार ५ पोलीस आणि एक स्थानिक रहिवासी जखमी झालेले आहेत.

या प्रकरणानंतर सिंघू बॉर्डरवरील परिस्थिती अत्यंत नाजूक आणि तणावपूर्ण आहे.

Exit mobile version